शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर जमीन देण्यास तयार

By admin | Updated: February 24, 2016 02:38 IST

पणजी : राजधानी पणजीतील काही जागा महापालिकेस देण्यासाठी लष्कर तयार झाले आहे. लष्कराने तसे पत्र महापालिकेस पाठवले

पणजी : राजधानी पणजीतील काही जागा महापालिकेस देण्यासाठी लष्कर तयार झाले आहे. लष्कराने तसे पत्र महापालिकेस पाठवले असून महापालिकेने हा विषय सरकारकडे सोपविला आहे, असे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत कुंकळयेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. कुंकळयेकर यांना आमदार म्हणून कारकिर्दीचे एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांनी आपले प्रगती पुस्तक मंगळवारी जाहीर केले. आपण जाहीरनाम्यातून पणजीच्या पोटनिवडणुकीवेळी पणजीवासीयांनी जी आश्वासने दिली होती, त्यापैकी ८० टक्के आश्वासने मार्गी लागली. काही कामे पूर्णही झाली आहेत. पणजीत कुणाला तातडीने वैद्यकीय उपचार हवे झाले, तर कांपाल येथील मिलिटरी इस्पितळातही अशा रुग्णास जाता येईल. हे इस्पितळ त्यासाठी लष्कराने खुले केले असल्याचे कुंकळयेकर यांनी सांगितले. लष्कर पणजीतील काही जागा देण्यास तयार झाले आहे, असेही ते म्हणाले. मांडवी नदीवर तिसऱ्या पुलाचे काम जोरात सुरू आहे. पर्र्वरीच्या बाजूने नियोजित वेळापत्रकानुसार काम सुरू असून मेरशीच्या बाजूने कामावर परिणाम झाला आहे; कारण त्या बाजूला खारफुटी असल्याने विषय राष्ट्रीय हरित लवादाकडे पोहचला आहे. लवादाच्या अपेक्षेनुसार कदाचित यापुढे मेरशीच्या बाजूने पुलाचे डिझाईन बदललेही जाऊ शकते, असे कुंकळयेकर यांनी सांगितले. रायबंदरच्या भागात ११ कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्या टाकल्या जातील. त्या कामाची निविदा जारी करण्यात आली आहे. कांपाल येथे फुटबॉल स्टेडियम बांधण्यासाठीही निविदा जारी करण्यात आली आहे. पर्यटन विकास महामंडळाकडून बोक द व्हाक येथील तळ््याचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. येथील हिरा पेट्रोल पंपच्या मागे सुक्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारण्याचे काम जोरात सुरू आहे, असे कुंकळयेकर यांनी सांगितले. सांतइनेज येथील खाडीवर दोन्ही बाजूला बॅरिकेड्स घालण्याचा विचार आहे. पणजीत एकमार्गी वाहतूक व्यवस्था ९५ टक्के यशस्वी ठरली, असेही ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)