शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

अर्जुन, जान्हवीसोबत चित्रपट दिग्दर्शित करणार : बोनी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 19:27 IST

भविष्यात अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर यांना सोबत घेऊन चित्रपटाची निर्मिती करेन आणि त्यांच्यासाठी दिग्दर्शनही करेन, अशी घोषणा निर्माता, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी बुधवारी गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये केली.

- संदीप आडनाईकपणजी : भविष्यात अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर यांना सोबत घेऊन चित्रपटाची निर्मिती करेन आणि त्यांच्यासाठी दिग्दर्शनही करेन, अशी घोषणा निर्माता, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी बुधवारी गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये केली. कर्न्व्हसेशन वुईथ कपूर्स या मास्टर क्लास कार्यक्रमात बोनी कपूर आणि जान्हवी कपूर हे बापबेटी उपस्थित होते.अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या बोनी कपूर यांनी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अभिनय सोडावा लागला आणि निर्मिती क्षेत्रात उतरावे लागल्याची कबुली देत भविष्यात कपूर कुटुंबीयांना घेऊन एखादा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रसिकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले. या चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत त्यांच्या काकांना आणि त्यांच्या मुलांच्याही भूमिका असतील, असे बोनी कपूर म्हणाले. अनिल कपूर, संजय कपूर या दोघांच्याही मुलांचा समावेश या चित्रपटात असेल आणि त्यांच्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रातही पुनरागमन करेन, असे ते म्हणाले.राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, बी. आर. चोप्रा. यश चोप्रा, आदित्य चोप्रा यांच्याप्रमाणेच बोनी कपूर,अनिल कपूर आणि संजय कपूर या कपूर घराण्यातील त्रिमूर्ती चित्रपट क्षेत्रात प्रसिध्दीच्या शिखरावर आहेत, अशा शब्दात कपूर्ससोबत कला अकादमीत भरगच्च गर्दीत मास्टर क्लास रंगला. निर्माते राहुल रवैल यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून आल्याचे मत मुलाखतकारांनी मांडले. या वेळी बोनी कपूर यांनी तांबे युग, चंदेरी युग, सुवर्ण युग आणि आता हीरकयुग सुरू असल्याचे सांगून पूर्वीपेक्षा या क्षेत्रात काम करण्याच्या अनेक पध्दती बदलल्याचे सांगितले.पूर्वी ५0-६0 सिनेमाघरात चित्रपट प्रदर्शित होत होते, आज ठग्ज आॅफ हिंदुस्थानसारखा चित्रपट ७000 सिनेमाघरात प्रदर्शित झाला आणि चीनमध्येही प्रदर्शित होतोय, असे सांगून भानू अथैय्या, ए. आर. रेहमान, रस्सूल पकूटी यांची उदाहरणे देत भारतीय सिनेमा तांत्रिकदृष्ट्या आॅस्करच्या तुलनेत सुरुवातीपासूनच वरचढ असल्याचे सांगितले. सहाय्यक एडिटर, सहाय्यक दिग्दर्शक अशा भूमिकेतून निर्माता झालो. अभिनयाचा प्रांत अनिल कपूरसाठी सोडल्याचे सांगून कपूरांची नवी शाखा आता सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.लेखकांसाठी आवाहनबोनी कपूर यांनी पूर्वीही लेखकांची बॉलिवूडला गरज होती, आणि आजही आहे असे सांगून लेखकांना कथासंकल्पना पाठविण्याचे आवाहन केले. उपस्थित प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून निर्माते, दिग्दर्शकांशी लेखकांनी संपर्क साधावा. चांगल्या संकल्पनेवरील कथानकावर चित्रपट काढता येईल, असे आवाहन बोनी कपूर यांनी केले.अर्जुन कपूरसाठी माफीअर्जुन कपूर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होता, मात्र त्याच्या पानिपत या चित्रपटातील त्याचा लूक जाहीर होउ नये, यासाठी त्याचे दिग्दर्शक प्रयत्न करत आहेत. इन्स्टाग्रामवरही तो चेहरा लपवून फिरत असल्याचे पोस्ट पडली असल्याचे सांगून बोनी कपूर यांनी अर्जुन कपूरच्यावतीने माफी मागितली.श्रीदेवीच्या आठवणीने बापबेटी भावुकश्रीदेवीचा उल्लेख या मुलाखतीत येणे साहजिकच होते. जान्हवी कपूर आणि बोनी कपूर दोघेही त्यांच्या आठवणीने भावविवश झाले. जान्हवी कपूरने तिच्यावर केलेली कविता सादर करुन तिच्याप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावू आणि स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करु असे सांगितले. आईच्या मृत्यूनंतर आमचा परिवार एक झाल्याचे तिने सांगितले, तर बोनी कपूर यांचा स्वर श्रीदेवीबद्दल बोलताना जडावला. ३0 वर्षात ३0 चित्रपट तिने केल्याचे सांगून सुनहरा संसार आणि ज्यूली चित्रपटात तिने बाल कलाकार म्हणून काम केल्याचे सांगितले. तिन पिढ्यांसोबत तिने काम केल्याचे बोनी कपूर यांनी आवर्जुन सांगितले. ती सुपरस्टार होती. मॉमसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण तिच्या हयातीत तो पुरस्कार मिळायला हवा,अशी खंतही व्यक्त केली.