शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

‘माड’ विधेयकास राज्यपालांची मंजुरी

By admin | Updated: March 12, 2016 02:38 IST

सद्गुरू पाटील ल्ल पणजी माडाला गवत ठरवून माडांच्या कत्तलीचा मार्ग मोकळा करण्याच्या सरकारच्या विधेयकाविरोधात विरोधकांनी केलेल्या उठावाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी

सद्गुरू पाटील ल्ल पणजी माडाला गवत ठरवून माडांच्या कत्तलीचा मार्ग मोकळा करण्याच्या सरकारच्या विधेयकाविरोधात विरोधकांनी केलेल्या उठावाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी या विधेयकाला मंजुरी दिली. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खास ‘लोकमत’ला ही माहिती शुक्रवारी दिली. राज्यपालांचा हिरवा कंदील मिळाल्याने आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याविषयी संतप्त पडसाद उमटण्याची शक्यता आहे. १९८४ सालच्या गोवा, दमण व दीव वृक्ष संवर्धन कायद्यात गेल्या जानेवारीमध्ये गोवा विधानसभेने दुरुस्ती करून जुने, निरुपयोगी व मोडकळीस आलेले माड कापण्यासंबंधीची प्रक्रिया सुलभ केल्यानंतर विरोधकांनी मोठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज्यभर त्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलनही सुरू आहे. माडासंबंधीच्या विधेयकात २००८ सालीही दुरुस्ती करण्यात आली होती. विद्यमान सरकारच्या मंत्रिमंडळाने गेल्या डिसेंबरमध्ये माडासंबंधीची दुरुस्ती मंजूर केली. त्यानंतर सरकारवर काही अपक्ष आमदारांनी तसेच पर्यावरणवाद्यांनी टीका सुरू केली. मात्र टीकेची पर्वा न करता गेल्या ५ जानेवारी रोजी सरकारने हे विधेयक विधानसभेत मांडले. हे विधेयक मंजूर करू नये म्हणून विरोधकांनी तसेच काही निमसरकारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांना निवेदन सादर केले होते. आम आदमी पक्षानेही याविरुद्ध भूमिका घेतली होती. गोवा नारळ उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र दुरुस्तीचे स्वागत करणारे निवेदन राज्यपालांना दिले होते. काही बांधकाम व्यावसायिकांनीही जाहीरपणे दुरुस्तीचे स्वागत केले. गोवा फॉरवर्ड पक्षाने पेडण्याहून माड यात्रा सुरू करत सरकारच्या निर्णयास विरोध चालविला. पण राज्यपालांनी सर्व बाजूंचा अभ्यास करून या दुरुस्ती विधेयकास मंजुरी दिली. विधानसभेने विधेयक मंजूर न करता लगेच सरकारने ते विधेयक राज्यपालांकडे पाठविले नाही. ५0 दिवसांनंतर वातावरणाचा अंदाज सरकारने घेतला व गेल्या आठवड्यात राज्यपालांकडे विधेयक पाठविले.