शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील प्रशासन हाताळण्यासाठी सर्वपक्षीय सल्लागार समिती नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:46 IST

विजय सरदेसाई: मुख्यमंत्री दबाब हाताळू शकत नसल्याचा दावा

मडगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या दोन आठवड्यातील गोव्यातील एकंदर परिस्थिती पाहिल्यास राज्याचे प्रशासन हाताळण्यासाठी त्वरित सर्वपक्षीय सल्लागार समिती नेमण्याची गरज असल्याचे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

या संबंधी जारी केलेल्या एका व्हिडिओत सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीका करताना ज्या गंभीरतेने परिस्थिती हाताळण्याची गरज होती त्या गंभीरतेने ती हाताळली जात नाही.  विरोधकांच्या मागणीमुळे आपण मार्केट खुले करतो पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आपण जबाबदार नाही अशा प्रकारचे वक्त्यव्य करून ते आपल्यावरची जबाबदारी ढकलू पाहतात, हे सर्व पाहिल्यास राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत हे स्पष्ट होते. ही परिस्थिती कशी हाताळावी हे ठरविण्यासाठी मुख्यमंत्री केवळ सत्ताधारी आमदारांचीच बैठक घेतात, ते पाहिल्यास विरोधकांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होतो हे स्पष्ट झाले आहे. वास्तविक अशा आणीबाणीच्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायचा असतो. या सर्व पार्श्वभूमीवर अशी सर्वपक्षीय सल्लागार समिती नेमण्याची नितांत गरज वाटते असे ते म्हणाले.

ही समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमावी मात्र निर्णय सर्वसमावेशकपणे घेण्यासाठी इतर पक्षांच्या आमदारांचा त्यात समावेश असावा जेणेकरून घेतकेल्या निर्णयाचे उत्तरदायित्व सर्वावर राहील आणि त्यात पक्षपातीपणाही राहणार नाही असे ते म्हणाले.

गोव्यात सगळे आलबेल आहे असे जरी भरविण्यात येत असले तरी खरेच तशी स्थिती आहे का असा सवाल सरदेसाई यांनी केला असून जर उद्या गोव्यात आरोग्य आणीबाणी निर्माण झाली तर ती स्थिती हाताळण्यासाठी आमचे प्रशासन खरंच सक्षम आहे का हेही तपासून पाहण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.