शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदी आंदोलनाचा आणखी एक विजय; बारमालकांची याचिका गोवा खंडपीठाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 21:38 IST

सत्तरीच्या दारूबंदीविरुद्ध बारमालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल केलेली याचिका खंडपीठाने मंगळवारी फेटाळली.

पणजी: सुर्ला - सत्तरीच्या दारूबंदीविरुद्ध बारमालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल केलेली याचिका खंडपीठाने मंगळवारी फेटाळली. स्थानिक सुर्ला ग्रामपंचायतीने मद्यालयांचे परवाने मागे घेतल्यामुळे याचिकादारांनी अगोदर पंचायत संचालकाकडे दाद मागावी असे खंडपीठाने सुनावले आाहे. सुर्ला ग्रामपंचायतीने मद्यालयांचे परवाने मागे घेतल्यानंतर मद्यालयांच्या मालकांनी या निर्णयाविरुद्ध खंडपीठात आव्हान दिले होते. याचिका दाखल केल्यानंतर पंचायतीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा अंतरीम आदेशाची मागणीही याचिकादाराने केली होती, परंतु ती खंडपीठाने फेटाळली होती. या प्रकरणावर सुनावणी पूर्ण होवून न्यायमूर्ती एन एम जामदार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने मंगळवारी निवाडा सुनावला. याचिकादाराने ग्राम पंचायतीच्या निर्णयाविरुद्ध पंचायत संचालनयासमोर दाद मागावी असे खंडपीठाने सुनावले. तसेच पंचायत संचालनालयाला ६ आठवड्यात या प्रकरणात अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. सत्तरी तालुक्यातील सूर्ल या गावात अनेक कुटुंबे ही दारूच्या व्यसनामुळे उध्वस्त झाली असल्यामुळे आणि त्या ठिकाणी येणारे पर्यटकही दारू पिऊन गुंडागर्दी करीत असल्यामुळे या गावातील लोकांनी दारुबंदीचे रणशिंग फुंकले होते. स्थानिक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही तसा ठराव संमत करून घेतला होता. त्यानंतर पंचायतीने दारुचे परवाने रद्द केले होते.  प्रशासनाने त्यामुळे सुर्लात दारुबंदी केली होती. खंडपीठाच्या निवाड्यामुळे बारमालकांची निराशा झाली आहे तर दारुबंदीसाठी आंदोलन पुकारणा-या सुर्लावासियांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :goaगोवा