शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी मराठी अकादमीची हंगामी कार्यकारिणी जाहीर

By admin | Updated: August 13, 2014 01:46 IST

पणजी : सरकारी मराठी अकादमीची हंगामी कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी प्रा. अनिल गजानन सामंत यांची नियुक्ती केली आहे.

पणजी : सरकारी मराठी अकादमीची हंगामी कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी प्रा. अनिल गजानन सामंत यांची नियुक्ती केली आहे. १३ सदस्यीय कार्यकारिणीवर ९० दिवसांत अकादमीची घटना तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रायबंदर येथे प्रसूतिशास्त्र विभागाच्या जुन्या इमारतीत या अकादमीला जागा देण्यात आलेली आहे. उपाध्यक्षपदी साहित्यिक अशोक नाईक तुयेकर (पुष्पाग्रज) यांची नियुक्ती केली आहे. या कार्यकारिणीवर इतर सदस्यांमध्ये लेखक चंद्रकांत महादेव गावस, पौर्णिमा राजेंद्र केरकर, वल्लभ केळकर, गजानन मांद्रेकर, पत्रकार सागर जावडेकर, परेश प्रभू, जनार्दन वेर्लेकर, तुषार टोपले, आनंद मयेकर, दशरथ परब यांचा समावेश आहे. शशांक ठाकूर हे सदस्य-सचिव म्हणून काम पाहतील. १५ आॅगस्टपर्यंत कार्यकारिणी जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत केली होती. ही कार्यकारिणी अस्थायी स्वरूपाची आहे. सध्या अस्तित्वात असलेली मराठी अकादमी कारभार सुधारण्यास तयार नाही. ६० लोकांपुरतीच ती मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे इतर मराठी भाषिकांवर अन्याय होतो, अशा तक्रारी होत्या. कारभार सुधारण्यास सरकारने वेळही देऊन पाहिला; परंतु कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे ही अकादमी ताब्यात घेण्याचा इशारा सरकारने दिला होता. आता नव्या मराठी अकादमीची कार्यकारिणी सरकारने जाहीर केली आहे. मराठीचे संवर्धन आणि विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मराठी भाषिक लोक १० ते १५ कोटी आहेत. महाराष्ट्रात मराठी आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेच्या आक्रमणाचा वेगळा धोका मराठीला नाही; परंतु तो कोकणीला मात्र आहे. त्यामुळे कोकणीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)