शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

...आणि आॅनर किलिंगच्या बातम्यांचा पाऊस पडला

By admin | Updated: July 19, 2016 20:39 IST

‘सैराट’ चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगावर खूप चर्चा झाली. या प्रसंगानंतर आॅनर किलिंगच्या बातम्यांची कात्रणे दाखवावीत, असा सैराटच्या चमूचा प्रारंभीचा विचार होता. त्यासाठी काही

- मिथुनचंद्र आणि पूजा : ‘लोकमत’च्या पणजी कार्यालयास सदिच्छा भेट

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 19 -  ‘सैराट’ चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगावर खूप चर्चा झाली. या प्रसंगानंतर आॅनर किलिंगच्या बातम्यांची कात्रणे दाखवावीत, असा सैराटच्या चमूचा प्रारंभीचा विचार होता. त्यासाठी काही कात्रणांची जमवाजमव सुरू झाली, तेव्हा अशा बातम्यांच्या कात्रणांचा अक्षरश: पाऊसच पडला. त्यात वादग्रस्तताही होती. नंतरच्या प्रवासात कात्रणे दाखविण्याचा विचार मागे पडला आणि रक्तपावले झाल्यानंतर एक प्रवास थबकला... थांबला नव्हे; कारण हा सिनेमा डोक्यावर घेऊन प्रेक्षक बाहेर पडले. त्यामुळे महाराष्ट्रानेच काय, अखंड देशाने हा चित्रपट डोक्यावर घेतला. मिथुनचंद्र चौधरी आणि पूजा डोळस बोलत होत्या.मिथुनचंद्र म्हणजे सैराटमधील प्राध्यापक लोखंडे. पूजा म्हणजे आर्चीला पकडून पोलीस ठाण्यात आणणारी महिला कॉन्स्टेबल. या ओळखीशिवायही या दाम्पत्याची स्वतंत्र अशी ओळख आहे. दोघेही ‘सैराट’च्या निर्मिती चमूचा भाग आहेत. मिथुनचंद्रने ‘कम्पलसरी हेल्मेट’ हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी ‘पायवाट’ची निर्मिती केली. ‘पायवाट’ने राष्ट्रीय पुरस्कार शैक्षणिक विभागात पटकावला. पूजाने सैराटसाठी साहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. या दोघांनी सोमवारी ‘लोकमत’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली आणि गप्पाही सैराट झाल्या. सैराटच्या निर्मितीत समूहभावना कशी होती, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. पडद्याआडच्या गमती-जमती उलगडल्या.अस्सल देशीयता या वैशिष्ट्यामुळे चित्रपट महाराष्ट्राबाहेर पोहोचला. अमराठी प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतला. चित्रपट गाजेल एवढा विश्वास होताच; पण तो त्याही पुढे जाऊन त्याने रेकॉर्ड ब्रेक केले, हे सांगताना दोघांच्याही चेहऱ्यावर अपार आनंद झळकत होता. आपल्यासमोर घडते आहे, ते खरे आहे हे प्रेक्षकांना खूप भावले. याशिवाय कलाकार हे बनचुके व्यावसायिक कलाकार नव्हते. ते जसे बोलतात तसेच चित्रपटात दाखविले गेले आणि हा प्रयोग प्रेक्षकांना खूपच आवडला. हे कलाकार दोन महिने एकत्रितपणे राहात होते. त्या काळात त्यांचे अभिनय आणि अन्य बाबींचे प्रशिक्षण झाले. याची काही जबाबदारी पूजा यांच्यावरही होती. चित्रपटाचे खेळ जाहीर होण्यापूर्वी आणि नंतर अल्पकाळ विरोध झाला. दुसरीकडे हा चित्रपट झळकला आणि प्रेक्षकांनी उचलून धरला, तसतसा विरोध मावळला. विरोध करणारे खूप थोडे होते. त्यांचेही प्रबोधन झाले असावे, असे वाटते. नंतर संबंधित संघटनेनेच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुरस्कार जाहीर केला. विरोध अल्पजीवी ठरला, अशी आठवणही चर्चेत अधोरेखित झाली.

- चित्रपट आणि वास्तवचित्रपट प्रदर्शित झाला आणि कोल्हापुरात सैराटसारखीच एक घटना घडली. आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला मुलीच्या भावांनी ठार केले. आॅनर किलिंगच्या अशा अनेक घटना चर्चेदरम्यान उल्लेख झाला.प्रेम ही एवढी सुंदर गोष्ट आहे, की त्याला विरोध का करावा? प्रेम करावयाचे असेल तर अन्य सगळ्याच गोष्टींची आडकाठी ठरूच नये. असे असले तरी सामाजिक वास्तव भयंकर आहे, ते चित्रपटात दाखवले आहे.- पूजा, साहाय्यक दिग्दर्शक, सैराटआयुष्य छान जगायचे असेल तर जात, धर्म, देव आदी बाबी आड येता उपयोगी नाहीत. आपण छान विचार केला पाहिजे. काही बाबी दुरुस्त करण्याची तयारी ठेवली पाहिजे.- मिथुनचंद्र चौधरी, दिग्दर्शक, अभिनेता- आर्चीला घडवण्यातही पूजाचा सिंहाचा वाटा‘सैराट’ची नायिका रिंंकू राजगुरू ही दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मैत्रिणीची मुलगी. मैत्रिणीने विश्वासाने तिला या चमूकडे सोपविले. ती अननुभवी; परंतु दोन महिने आपल्याकडे ठेवून घेऊन पूजा डोळस हिने तिला ‘तयार’ करण्याचे काम केले. रिंकू चित्रपटात जी ‘भाषा’ बोलते, तीच तिची नेहमीच्या बोलण्याचीही भाषा आहे.