शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

‘स्मार्ट सिटी’त सापडली प्राचिन मूर्ती, पुरातत्व खात्याने घेतला ताबा

By समीर नाईक | Updated: April 30, 2024 21:24 IST

मूर्तीचे युरोपियन संस्कृतीशी नाते : प्रा. राजेंद्र केरकर

पणजी : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत फूटपाथसाठी खोदकाम सुरू असताना चर्च स्केअर येथील पालिका उद्यानासमोर मंगळवारी कामगारांना प्राचिन मूर्ती आढळली. मूर्ती आढळल्याची माहिती मिळताच मोठी गर्दी झाली. शिल्पकलेचा आविष्कार दर्शविणारी ही मूर्ती मिळाल्याचे समजताच पुरातत्व खात्याच्या खास पथकाने घटनास्थळी दाखल होत पोलिस बंदोबस्तात मूर्ती ताब्यात घेतली. मूर्तीच्या परीक्षणानंतर याचे गुढ उलगडेल असे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जुन्या रिट्स हॉटेलजवळील हरी रघु बोरकर यांच्या मालकिच्या बार्बरिया इंडियन या सलून दुकानाच्या उबंरठ्याखाली जमिनीत ही मूर्ती होती. मूर्ती केवळ एक फूट खोलवर पालथी असल्याने ती कोणाच्याही लक्षात आली नाही. पण, फूटपाथ दुरुस्तीसाठी खोदकाम करताना मूर्तीवर वार झाला, तेव्हा दगडाचा तुकडा बाहेर काढला गेला. तेव्हा हा केवळ दगड नसून प्राचिन मूर्ती असल्याचे लक्षात आले. नंतर जेसीबीच्या सहाय्याने मूर्ती सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.

मूर्ती जवळपास अडीच मिटर लांब आहे. मूर्तीतील व्यक्ती तरुण असावी. या तरुणास दाढी, मिश्या आणि लांब केस आहेत. युवक काेणते तरी वाद्य वाजवित आहे, असे प्रथमदर्शी दिसते. मूर्तीच्या पायाजवळ एक सिंहसदृश प्राणी रेखाटलेला आहे. मात्र हा नेमका सिंह आहे की आणखी कुठला प्राणी, याबाबत साशंकता आहे. मूर्ती घडवताना सिमेंटचा वापर झाला असल्याचे दिसून येते. मात्र मूर्ती वजनाने जड आहे. पुरातत्त्व खात्याकडून पुढील काही दिवसांत याचे गुढ उलगडू शकेल.

लोकांनी केली गर्दी ज्या ठिकाणी मूर्ती मिळाली, तेथील दुकाने ५० वर्षांपेक्षा जुनी आहे. गेल्या पाच दशकात येथे फारसे नूतनीकरण वा इतर काम झालेले नाही. आश्चर्य म्हणजे फूटपाथदेखील झाले नव्हते. आता जेव्हा स्मार्ट सिटी योजनेची कामे सुरू आहे, त्या कामातील खोदकामात मूर्ती सापडली आहे. मूर्ती सापडल्याचे समजताच लोकांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. मूर्ती साधारणत: ४०० वर्षे जुनी असावी, ती कदंब काळातील असू शकते, असाही तर्क आहे.

मूर्तीचे युरोपियन संस्कृतीशी नाते : प्रा. राजेंद्र केरकरजलमार्गाशी निगडित, मांडवी नदीकाठी वसलेली पणजी ही वेगवेगळ्या संस्कृतीशी संबंधित होती. पणजीत सापडलेली मूर्ती या शहरातील सांस्कृतिक संचिताची खूण असून, इथल्या समृद्ध इतिहासाची प्रचिती यातून मिळते. सिंहासमवेत असलेली ही मूर्ती युरोपियन संस्कृतीशी नाते सांगणारी आहे,’ अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी दिली.

टॅग्स :goaगोवा