शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाताळनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण; जुने गोवा चर्च परिसर, पणजी चर्च स्क्वेअर येथे पर्यटकांची गर्दी 

By समीर नाईक | Updated: December 25, 2023 16:00 IST

नाताळ सणानिमित्त सर्वाधिक गर्दी ही जुने गोवा येथील जगप्रसिद्ध चर्च बेसिलिका ऑफ बोम जिसस येथे पाहायला मिळाली

पणजी: नाताळ निमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी मध्यरात्रीपासून राज्यभरातील चर्चमध्ये प्रार्थना ऐकू येत होत्या. जे पहाटेपर्यंत सुरूच होत्या. सोमवारी देखील चर्चमध्ये लोकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. लोकांनी आपल्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. राजकीय नेत्यांनी देखील गोमंतकियाना शुभेच्छा दिल्या आहेत. 

नाताळ सणानिमित्त सर्वाधिक गर्दी ही जुने गोवा येथील जगप्रसिद्ध चर्च बेसिलिका ऑफ बोम जिसस येथे पाहायला मिळाली. या चर्चचे वैभव पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच आकर्षित करते. गोमंतकियांची येथे श्रद्धा आहेसच, पण जगभरातील अनेक ख्रिस्ती, व इतर धर्मातील लोक या चर्च ला भेट देण्यासाठी व येथील वैभव अनुभवण्यासाठी येत असतात. सध्या विकेंड मिळाल्याने शनिवारपासून जूने गोवे येथे पर्यटकांनी गर्दी केली. सोमवारी पहाटेपासून भाविकांच्या मोठ्या रांगा होत्या.

लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. डिसेंबरमध्ये किनारी भागात पार्ट्यांना ऊत आलेले असते, याचाही आनंद पर्यटक लुटतात. त्यात राज्यातील नाताळ सण म्हणजे पर्यटकांना सोने पे सुहागाच असते. राज्यातील प्रत्येक वारसा स्थळे, प्रसिद्ध ठिकाण, व किनारी भागात पर्यटकांची अलोट गर्दी असते.

 चर्चची विद्युत रोषणाई, गोटे, स्टार्स वेधतात लक्ष्य राज्यातील अनेक चर्चनां नाताळ, व ख्रिस्ती नवीन वर्षानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पणजी चर्च स्क्वेअर तर या दिवसात पर्यटकांची सर्वाधिक पसंद असते. तसेच ठिकठिकाणी ख्रिस्ती बांधवांकडून खास आकर्षक गोटा तयार करण्यात आला आहे, जे सर्वांचेच लक्ष्य आपल्याकडे वेधून घेत आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवर सजविलेले स्टार्स व ख्रिसमस ट्री हमखास दिसून येत आहेत. या सर्व गोष्टी सर्वाचेच लक्ष्य आपल्याकडे वेधत आहे.