शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अमित शहा भेटीची जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2016 22:30 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येत्या शनिवारी गोवा भेटीवर दाखल होत आहेत. बुथस्तरीय कार्यकर्त्यांच्या संमेलनावेळी ते मार्गदर्शन करणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येत्या शनिवारी गोवा भेटीवर दाखल होत आहेत. बुथस्तरीय कार्यकर्त्यांच्या संमेलनावेळी ते मार्गदर्शन करणार आहेत. सुमारे साडेसहा ते सात हजार कार्यकर्त्यांची नावे या संमेलनासाठी आत्तापर्यंत भाजपच्या येथील कार्यालयात सादर झाली आहेत.
राज्यात एकूण 1 हजार 635 बूथ आहेत. प्रत्येक बूथ क्षेत्रतून सात ते दहा कार्यकत्र्याची नावे येत आहेत. एका मांद्रे मतदारसंघातून सुमारे 430 कार्यकर्त्यांची  नावे आलेली आहेत. ज्या मतदारसंघातील बूथ क्षेत्रांमध्ये भाजपचे बळ कमी आहे तिथून सरासरी तीन ते पाच नावे येत आहेत. या सर्व कार्यकत्र्याना पक्षाकडून ओळखपत्रे दिली जाणार आहेत. ओळखपत्र असलेल्या कार्यकत्र्यालाच संमेलनामध्ये भाग घेता येईल. 20 रोजी सायंकाळी चार वाजता बांबोळी- दोनापावल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात हे संमेलन होईल. ते प्रसार माध्यमांसाठीही खुले आहे. बूथस्तरीय कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणी आणण्यासाठी पक्षातर्फे वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
अमित शहा हे 19 रोजी रात्री गोव्यात दाखल होणे अपेक्षित होते. तथापि, आता त्यांचा कार्यक्रम थोडा बदलला असून ते 20 रोजी दुपारी एक वाजता गोव्यात पोहचतील. त्यानंतर आल्तिनो येथील स्टेट गेस्ट हाऊसमध्ये ते जातील. तिथे मुख्यमंत्र्यांशी, मंत्र्यांशी व भाजपच्या कोअर टीमशी त्यांची बैठक होईल. त्यानंतर ते संमेलनाच्या ठिकाणी कार्यकत्र्याना मार्गदर्शन करणार आहेत. 20 रोजी रात्रीच ते दिल्लीला परततील. अमित शहा हे कधीच पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत नाहीत, ते सरकारी विश्रामगृहात वगैरे राहणे पसंत करतात, असे पक्ष सुत्रांनी सांगितले. भाजपची सारी यंत्रणा सध्या संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.