शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सर्व दाखले आॅनलाइन, मोफत!

By admin | Updated: May 18, 2017 02:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : सरकारी कार्यालयांमध्ये न जाता निवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, डोमिसाईल, उत्पन्न, मार्टिझ, जमीन रूपांतर, जमिनीचे

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : सरकारी कार्यालयांमध्ये न जाता निवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, डोमिसाईल, उत्पन्न, मार्टिझ, जमीन रूपांतर, जमिनीचे पार्टिशन वगैरे दाखले व प्रमाणपत्रे आॅनलाइन मिळणार आहेत. या प्रकल्पाचा प्रारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी येथे केला. आॅनलाइन प्रमाणपत्रे मोफत मिळतील, असे पर्रीकर व खंवटे यांनी जाहीर केले.उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन, माहिती खात्याचे संचालक अमेय अभ्यंकर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांच्या उपस्थितीत ॅङ्मंङ्मल्ल’्रल्ली.ॅङ्म५.्रल्ल या ई-जिल्हा पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आॅनलाइन सेवेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने आधार कार्ड क्रमांक वापरावा. मोबाईलवर अर्जाची स्थिती अर्जदाराला कळेल. नवा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असावा. ज्यांच्याजवळ आधार कार्ड नाही, त्यांना आॅनलाइन दाखले व प्रमाणपत्रे प्राप्त करता येणार नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन प्रमाणपत्रांसाठी अर्ज करावा लागेल. एरव्ही जे दाखले व प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी थोडे शुल्क भरावे लागते, ते शुल्क आॅनलाइन पद्धतीत भरावे लागणार नाही. आम्ही ते शुल्क रद्द करत आहोत, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जाहीर केले.जर लोकांना आॅनलाइन पद्धतीनेही वेळेत सेवा दिली नाही, तर अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होईल. डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत गोव्यातील बहुतांश सेवा येत्या तीन ते सहा महिन्यांत आॅनलाइन होणार आहेत. सध्याच्या सेवा येत्या सोमवारपासून पूर्णपणे आॅनलाइन असतील. लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. वास्तविक लोक वीज बिलेदेखील आॅनलाइन भरू शकतात. त्यासाठी रांगा लावण्याची व गर्दी करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. आॅनलाइन डिजी लॉकरही उपलब्ध करून दिले जातील. म्हणजे आॅनलाइन मिळालेले आपले प्रमाणपत्र डिजिटल लॉकरमध्ये ठेवून मग दुसऱ्या कोणत्याही कामासाठी ते प्रमाणपत्र लॉकरमधून काढून सरकारी कार्यालयात लगेच सादर करता येईल. यामुळे पारदर्शकता येईल व लोकांना दाखले, प्रमाणपत्रे मिळण्यासाठी जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.