शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आता सर्व सरकारी प्रकल्प हरीत, विजय सरदेसाई यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:47 IST

गोव्यात यापुढे साकारले जाणारे सर्व सरकारी प्रकल्प ‘हरीत प्रकल्प’ असतील अशी घोषणा गोव्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी आज बुधवारी केली.

मडगाव: गोव्यात यापुढे साकारले जाणारे सर्व सरकारी प्रकल्प ‘हरीत प्रकल्प’ असतील अशी घोषणा गोव्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी आज बुधवारी केली. सरकारने या धोरणाला तत्वत: मान्यता दिली असून, लवकरच याबद्दल कायदा तयार करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यातील मडगाव येथील बोर्डा  भागातील आयटीआय व मल्टीपर्पज हायरसेंकडरी स्कूल इमारतीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाच्या पायाभरणीच्या नामफलकाचे आज बुधवारी सरदेसाई यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. हरीत प्रकल्प ही पर्यावरण जतन करण्यासाठी काळाची गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. पुढील पिढीसाठी काहीतरी चांगले दयायचे असेल तर त्याला आतापासूनच सुरुवात होणे गरजेचे आहे असे मंत्री सरदेसाई म्हणाले. पुढील पिढीसाठी विकास महत्वाचा आहे असे ते म्हणाले.सामान्य माणसांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत. चांगला गोवा बनवायचा असेल तर चांगले शिक्षणही उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले. येथील मल्टीपर्पज इमारतीचे दोन टप्प्यात काम होणार असून, आज पहिल्या टप्प्याच्या कामाचा नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. पंचवीस कोटी रुपयांचा खर्च करुन बांधण्यात येणारी ही इमारत वर्षभरात पूर्ण होईल. गोवा पायाभूत साधन सुविधा महामंडळातर्फे हे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. येथे फुटबॉल व क्रिकेटसाठी मैदान उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही सरदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचेही मंत्री सरदेसाई यांनी आभार मानले. आम्ही सरकार घडविले ते विकासकामाचे स्वप्न साकारावे यासाठी आहे. फातोर्डा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. विरोधात असतानाही आपण अनेक विषय मांडले होते. मात्र कामे झाली नाही. आम्ही प्रत्येकवेळी विकासासंबधीचे अनेक विषय लावून धरले होते. दहा वर्षात भाजपा आमदारांनी ज्याचा विचारही केला नाही ते आम्ही करुन दाखविले आहे. बाहय विकास आराखडा हा केवळ बिल्डरांसाठी आहे असे कुणी मानून घेऊ नये. सर्वसामान्यांनाही या आराखडयाचा लाभ होईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा