शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लवकरच आल्कॉन जीएसबी युनिटी चषक टी-२० स्पर्धेचे आयोजन

By समीर नाईक | Updated: February 6, 2024 16:32 IST

स्पर्धा ८ मार्च रोजी सुरू होणार असून ५ मे रोजी समाप्त होईल.

पणजी: गोवा जीएसबी स्पोर्टस् अँड चॅरिटेबल ट्रस्टने गोवा सारस्वत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या आल्कॉन जीएसबी युनिटी चषक टी - २० क्रिकेट स्पर्धेच्या जर्सींचे तसेच विजेतेपदाच्या चषकाचे नुकतेच गोवा सारस्वत समाज अन्न महोत्सवात माजी मुख्यमंत्री व मडगावचे विद्यमान आमदार  दिगंबर कामत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 

यावेळी नगरसेवक सगुण (दादा) नाईक, गोवा सारस्वत समाजाचे अध्यक्ष देश प्रभुदेसाई, गोवा महिला आयोगाच्या अध्यक्ष रंजिता पै, गोवा जीएसबी स्पोर्टस् अँड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धित पै रायतुरकर, सचिव वेंकट बिचे, स्पर्धा संयोजक सिद्धार्थ घाणेकर तसेच अन्य विश्वस्त कपिल बोरकर, कपिल आंगले, प्रणव बिचे, सचिन सरदेसाई, केतन कुंदे, विक्रम गायतोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 स्पर्धा ८ मार्च रोजी सुरू होणार असून ५ मे रोजी समाप्त होईल. शनिवार व रविवारी पणजी जिमखाना मैदान, एमसीसी मडगाव व एसके मैदान मळकर्णे येथे सामने खेळविले जातील. राज्यातील जीएसबी समाजातील एकूण १२ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आल्कॉन समुहाचे आकाश खवंटे हे या स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक आहेत तर कॉमनवेल्थ डेव्हलपर्सचे चिराग नाईक हे सहयोगी पुरस्कर्ते आहेत. डॅझर्टस् अँड मोरचे डॉ.सागर साळगावकर व मानस डेव्हलपर्सचे तन्मय खोलकर हे देखील सहयोगी पुरस्कर्ते आहेत.

श्यामराव बिल्डर्स यांनी या स्पर्धेसाठी फिरता चषक दान केला आहे. या स्पर्धेच्या चषक व जर्सी अनावरण प्रसंगी सिद्धित पै रायतुरकर यांनी सांगितले की, 'गोवा जीएसबी स्पोर्टस् अँड चॅरिटेबल ट्रस्ट' ही गोवा सारस्वत समाजाच्या भविष्यातील क्रीडा स्पर्धांसाठी अधिकृत ट्रस्ट असेल. याच ट्रस्टच्या झेंड्याखाली जीएसबी समाजाच्या विविध क्रीडा स्पर्धा होतील. ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक उपक्रम देखील भविष्यात राबवले जातील, असे सिद्धित पै  रायतुरकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवा