शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

लोकायुक्त निवड समितीला एजींचा रामराम

By admin | Updated: May 11, 2015 02:13 IST

लोकायुक्त निवड समितीला एजींचा रामराम

सद््गुरू पाटील ल्ल पणजीराज्यातील रिक्त लोकायुक्तपद भरले जावे म्हणून सरकारने अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांना निवड समितीचे अध्यक्षपद स्वीकारावे, असा प्रस्ताव पाठविला असता नाडकर्णी यांनी त्यास नम्रपणे नकारात्मक उत्तर देत निवड समितीला रामराम ठोकला. यामुळे लोकायुक्त निवड प्रक्रिया पुन्हा संथ बनली आहे.वीस महिने लोकायुक्तपद रिकामे आहे. पर्रीकर सरकार अधिकारावर असताना सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची लोकायुक्तपदी नियुक्ती झाली होती; पण नंतर रेड्डी यांना जे अनुभव आले, त्यामुळे नाराज होऊन त्यांनी आॅक्टोबर २०१३ मध्ये लोकायुक्तपदाचा राजीनामा दिला. त्यावेळपासून आतापर्यंत लोकायुक्तपद रिकामेच आहे.मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकायुक्त निवड प्रक्रिया प्राथमिक स्वरूपात आताच सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी अ‍ॅडव्होकेट जनरल नाडकर्णी यांना निवड समितीचे अध्यक्षपद भूषविण्यास सांगितले होते. पर्रीकर सरकार अधिकारावर असताना रेड्डी यांची लोकायुक्तपदी निवड ही नाडकर्णी समितीनेच केली होती. नाडकर्णी हेच त्या वेळी लोकायुक्त निवड समितीचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे आताही नाडकर्णी यांनीच लोकायुक्तांची निवड करावी, असे नव्या सरकारला अपेक्षित होते. त्यासाठी सरकारने फाईल नाडकर्णी यांच्याकडे पाठवली; पण आपल्याला लोकायुक्त निवड समितीच्या अध्यक्षपदी राहण्यात मुळीच रस नाही, असे सांगून नाडकर्णी यांनी फाईल परत पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.लोकायुक्त निवडीवेळी आपण पक्षपात केला, असा भविष्यात कोणी आपल्यावर आरोप करायला नको, या भूमिकेतून नाडकर्णी यांनी समितीला रामराम ठोकल्याचे नाडकर्णी यांच्या विश्वासातील काही मंडळींनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र, नकार देताना नाडकर्णी यांनी सरकारला काही सूचनाही केल्या आहेत. लोकायुक्त निवडीसाठी सरकारनेच देशाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र पाठवावे व सर्वोच्च न्यायालयाच्या काही चांगल्या निवृत्त न्यायमूर्तींची नावे त्यांच्याकडून घ्यावी आणि त्या नावांमधून एखाद्याची लोकायुक्तपदी निवड करावी, असे नाडकर्णी यांनी लेखी सरकारला सुचविले आहे.