शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

म्हापसा सबयार्डमध्ये अग्नितांडवबार्देस

By admin | Updated: December 6, 2015 01:40 IST

म्हापसा येथील सबयार्डमध्ये शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बांबूपासून बनवलेल्या डाळ्या, सूप, टोपल्या व

 म्हापसा येथील सबयार्डमध्ये शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बांबूपासून बनवलेल्या डाळ्या, सूप, टोपल्या व लग्नसराईसाठी लागणाऱ्या वस्तू व दी म्हापसा मर्चंट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे एक वातानुकूलन यंत्र मिळून सुमारे १५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. दर दिवशी या सबयार्डमध्ये बांबूपासून बनविलेल्या वेगवेगळ्या वस्तू घेऊन गोव्यातील ग्रामीण भागातून तसेच दोडामार्ग व इतर जवळच्या भागातून विक्रेते येतात व रात्रीच्या वेळी जाताना जवळच असलेल्या दी म्हापसा मर्चंट को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बाजूला ठेवतात. शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी हा माल मोठ्या प्रमाणात आणला जातो. कालच शुक्रवारचा बाजार होता. हा माल नेहमीप्रमाणे आणून ठेवला होता. त्याला शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. काहींनी म्हापसा अग्निशामक दलाला याची माहिती देताच दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्यासह हनुमंत हळदणकर, एम. एस. राऊत, प्रमोद गवंडी, व्ही. एस. राणे, प्रकाश घाडी, पी. एस. गावकर, यशवंत नाईक, प्रमोद महाले, फटजी गावकर, शिवाजीराव राणे, रूपेश गावस, दिप्तेश पै, एस. व्ही. तानावडे, मालू पावणे यांनी घटनास्थळी म्हापसातून तीन पाण्याचे बंब व पिळर्ण येथून एक पाण्याचा बंब मिळून चार बंब वापरून आग विझविली. ही आग त्वरित विझविली नसती, तर घटनास्थळी रांगेत असलेली सर्व दुकाने जळून खाक झाली असती आणि त्यात कोट्यवधींचे नुकसान झाले असते. दरम्यान, येथे असलेल्या दी म्हापसा मर्चंट को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअमरन व व्यापारी मनोज वाळके यांनी सांगितले की, आग लागल्याची माहिती म्हापसा अग्निशामक दलाला दिली; पण ते तत्काळ आले नाहीत. एका व्यक्तीला त्यांच्या कार्यालयात पाठवून त्यांना बोलावून घ्यावे लागले. दोन दिवसांपूर्वी कुणी तरी म्हापसा यार्डात आग लागणार, असे म्हणाला होता. त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या व्यापाऱ्यांचे किमान सात ते आठ लाखांचे नुकसान झाले. तर आमच्या बॅँकेची वातानुकूलन यंत्रणा जळून एक लाखाचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. म्हापसा व्यापारी संघटनेचे खजिनदार रामा ऊर्फ भाऊ राऊळ यांनी सांगितले की, येथील विजेच्या वायर खराब झालेल्या आहेत. तसेच येथे कोणतीही सुविधा नाही. या आगीत या मालाच्या विक्रेत्यांचे सुमारे १५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला, तर म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी या आगीत २ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आणि ८ लाखांचे साहित्य वाचविल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)