शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांविरुद्ध पुन्हा आंदोलन

By admin | Updated: July 25, 2015 03:03 IST

पणजी : राज्यातील चर्चशी निगडित डायोसेझन संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिले जाणारे अनुदान तत्काळ बंद केले जावे,

पणजी : राज्यातील चर्चशी निगडित डायोसेझन संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिले जाणारे अनुदान तत्काळ बंद केले जावे, अशी मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे शुक्रवारी येथे करण्यात आली. चर्र्च संस्था गोव्याच्या शिक्षण क्षेत्रात धार्मिक राजकारण करत असून आम्ही माध्यमप्रश्नी प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही मंचकडून देण्यात आला. मंचच्या नेत्या शशिकला काकोडकर, प्रा. सुभाष वेलिंगकर, उदय भेंब्रे, अरविंद भाटीकर, पुंडलिक नाईक आदींची येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. पर्रीकर सरकारने डायोसेझन संस्थेच्या १३२ इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याची तात्पुरती व्यवस्था केली होती. ती त्यांची चूक होती. पार्सेकर सरकारने ही व्यवस्था त्वरित बंद करावी; कारण ते घटनेविरुद्ध आहे, असे अ‍ॅड. भेंब्रे व इतरांनी सांगितले. आम्ही केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना या विषयाबाबत पत्रही लिहिले आहे. राज्य सरकारने जर अनुदान बंद केले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू; कारण आमची सहनशीलता आता संपली आहे, असे भेंब्रे म्हणाले. राज्यात चर्च संस्था धार्मिक राजकारण करत आहे. सरकारमधील ख्रिस्ती आमदार दबावाचे राजकारण खेळत आहेत. सर्व इंग्रजी शाळांना अनुदान मागणाऱ्या फोर्स संघटनेच्या मागे चर्च संस्था आहे. भारतीय संस्कृतीविरुद्ध हे कारस्थान आहे, असे भाटीकर म्हणाले. सरकारने अल्पसंख्याकांच्या दबावाखाली येऊ नये. फोर्स संघटनेने हिंसक आंदोलन करण्याची धमकी दिली आहे. आम्ही त्या धमकीचा निषेध करतो. आम्ही यापुढे अशा धमक्या खपवून घेणार नाही, असा इशारा भाषा सुरक्षा मंचने दिला. राजसत्ता म्हणजे सर्व काही नव्हे. जनतेची सत्ता ही सर्र्वश्रेष्ठ आहे. आम्ही जनतेच्या बाजूने आहोत. आम्ही सरकारला दिलेली वेळ संपली आहे. आता २०१६ सालच्या शैक्षणिक वर्षापूर्वी सरकारने डायोसेझनच्या शाळांचे अनुदान बंद करावे. आता मराठी-कोकणी शाळांमध्ये मुलांची संख्या वाढत आहे, असे वेलिंगकर यांनी काही शाळांच्या नावांसह सांगितले. आम्ही लवकरच पुढील कृती ठरवू. सरकारने इंग्रजी शाळांना अनुदान देण्याची व्यवस्था कायम करणारे विधेयक आणू नये, असे वेलिंगकर यांनी सांगितले.