शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयनंतर थेट कॉलेजमध्ये!

By admin | Updated: May 10, 2015 00:59 IST

पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून आता विविध कौशल्य विकसित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आठवीत

पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून आता विविध कौशल्य विकसित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आठवीत उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना दोन वर्षे आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन थेट अकरावीत प्रवेश घेण्याची किंवा दहावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांना थेट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी त्यामुळे मिळणार आहे. क्राफ्टमन ट्रेनिंग खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी शनिवारी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.कारखाने व बाष्पक निरीक्षकालय हे खातेही मंत्री ढवळीकर यांच्याकडे आहे. ते सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांची तिथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. एका परिषदेतही भाग घेतला. मंत्री ढवळीकर यांनी सांगितले की, गोव्यातील आयटीआय क्षेत्राचा पूर्ण नकाशाच आता बदलणार आहे. सगळा अभ्यासक्रम तयार झाला असून त्याची अंमलबजावणी आता सुरू होईल. प्रत्येक मुला-मुलींच्या कौशल्यानुसार त्यांना शिक्षण मिळावे, अशी सोय केली जाणार आहे. यासाठी सर्व ते साहाय्य करण्याचे आश्वासन आपल्याला केंद्रीय मंत्री रुडी यांनी दिले आहे.मंत्री ढवळीकर म्हणाले की, आता राज्यातील आयटीआयमध्ये आठवी उत्तीर्ण मुलांनी प्रवेश घेतला, तर दोन वर्षांनी त्यांना दहावी (एसएससी) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारे मुले मग हायर सेकंडरीत अकरावीत प्रवेश घेऊ शकतील. त्याचप्रमाणे दहावी शिकून मग कॉलेजला न पोहोचणारी मुलेदेखील दहावीनंतर दोन वर्षे आयटीआयमध्ये शिकली, तर त्यांना बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारे मुले मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतील. (खास प्रतिनिधी)