पणजी : राज्यात अतिरिक्त १४ पोलीस स्थानक उघडण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यासाठी पोलीस खाते आग्रही आहे. पोलीस बदल्या धोरणाचाही प्रस्ताव खात्याने पाठविला आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पोलीस खात्याने अलीकडे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांना सरकारकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल. राज्यात अतिरिक्त १४ पोलीस स्थानकांच्या प्रस्तावापैकीनऊ उत्तर, तर पाच दक्षिण गोव्यात आहेत. उत्तर गोव्यातील प्रस्तावित पोलीस स्थानकात बांबोळी, मेरशी, शिरोडा, धारबांदोड, साखळी, हरमल, थिवी, म्हार्दोळ आणि हळदोणा या ठिकाणांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात नावेली, फातोर्डा, बाणावली, सांकवाळ आणि पैंगीण या ठिकाणांसाठी प्रस्ताव आहेत. (पान २ वर)
अतिरिक्त १४ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव
By admin | Updated: February 8, 2015 01:32 IST