शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरवर गुणकारी अशी जाहिरात करुन तांब्याच्या बाटल्या विकणा-यावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 14:48 IST

विक्री प्रदर्शनात अशास्त्रीय वैद्यकीय स्वरुपाचे दावे करुन बनावट उत्पादने विकण्याचे प्रकार वाढू लागले असून अशाचप्रकारे कॅन्सरवर गुणकारी अशी जाहिरात करुन तांब्याच्या बाटल्या विकणा-या एका स्टॉलवर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कारवाई केली आहे.

मडगाव : शहरात आयोजित केल्या जाणा-या विक्री प्रदर्शनात अशास्त्रीय वैद्यकीय स्वरुपाचे दावे करुन बनावट उत्पादने विकण्याचे प्रकार गोव्यात वाढू लागले असून मडगावात अशाचप्रकारे कॅन्सरवर गुणकारी अशी जाहिरात करुन तांब्याच्या बाटल्या विकणा-या एका स्टॉलवर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कारवाई केली आहे.गुरुवारी ग्राहक चळवळीतील कार्यकत्र्याच्या नजरेस ही गोष्ट आल्यानंतर या स्टॉलच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन खात्याकडे तक्रार केली होती. या प्रदर्शनात बंगळुरु येथील एका उत्पादकाने विकण्यासाठी तांब्याच्या फ्लास्कसारख्या बाटल्या ठेवल्या होत्या. या बाटल्यात भरुन ठेवलेले पाणी पिल्यास कॅन्सरसारख्या व्याधीही दूर होतात अशी जाहिरात करण्यात आली होती. यापूर्वी मडगावात भरलेल्या आणखी एका प्रदर्शनात एडस्वर गुणकारी अशी जाहिरात करुन एका विशिष्टतरेच्या बिया विकण्याचा प्रयत्न झाला होता. हाही प्रयत्न ग्राहक चळवळीत अग्रेसर असलेल्या गोवा कॅन या संघटनेने हाणून पाडला होता. त्यानंतर या स्टॉल धारकावर अन्न व औषध प्रशासन खात्याने जादुई उपचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला होता.यासंदर्भात गोवा कॅनचे रोलंड मार्टिन्स यांनी तीव्र चिंता व्यक्त करताना अशा प्रदर्शनात खोटय़ा जाहिराती करुन उत्पादने विकली जातात. ज्यांचा कित्येकवेळा थेट आरोग्याशी संबंध असतो त्यामुळे अशा घटनांकडे अन्न व औषध प्रशासन गंभीरतेने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. अशी प्रदर्शने भरविताना अशाप्रकारच्या उत्पादनाला प्रतिबंध आणण्यासाठी या खात्याने उपाययोजना हाती घेण्याची मागणी त्यांनी केली.यासंबंधी अन्न व औषध प्रशासन खात्याचे संचालक सलीम वेलजी यांच्याशी संपर्क साधला असता, अशाप्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी खात्याने पाऊले उचलली असून यासंबंधी लवकरच खात्यातर्फे सूचना जारी केल्या जातील असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा