शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

बाबूश, माविनवर कारवाई अटळ

By admin | Updated: February 8, 2015 01:31 IST

पणजी : काँग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि माविन गुदिन्हो यांनी पक्षाशी पूर्ण असहकार पुकारल्याची गंभीर दखल

पणजी : काँग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि माविन गुदिन्हो यांनी पक्षाशी पूर्ण असहकार पुकारल्याची गंभीर दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रथमच घेतली आहे. मोन्सेरात व माविन यांच्यावर काँग्रेसने कारवाई करण्याचे तत्त्वत: ठरविले आहे. पणजी पोटनिवडणुकीनंतर कारवाईचा आदेश लगेचच जारी होणार असल्याची माहिती मिळाली. मार्च २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गुदिन्हो दाबोळी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. त्यावेळपासून गुदिन्हो यांनी नेहमीच काँग्रेसशी असहकार पुकारला. आपल्याला विरोधी पक्षनेतेपद दिले गेले नाही म्हणून गुदिन्हो यांनी भाजपशी सख्य जुळविले. पुढील विधानसभा निवडणूकही ते भाजपच्याच उमेदवारीवर लढवतील, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित करण्याचे जवळजवळ निश्चित केल्याची माहिती राजकीय गोटात पसरली आहे. २०१२ साली काँग्रेसच्या उमेदवारीवर सांताक्रुझ मतदारसंघातून निवडून आलेले बाबूश मोन्सेरात यांनी तर काँग्रेसचे निरीक्षक चेल्लाकुमार यांना आव्हानच दिले. पणजी पोटनिवडणुकीत काँग्रेससाठी काम करावे, अशी सूचना चेल्लाकुमार यांनी मोन्सेरात यांना केली होती. तथापि, आपण काँग्रेससाठी काम करणार नाही, उलट काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांचा पराभव व्हावा म्हणूनच प्रयत्न करीन, असे मोन्सेरात यांनी चेल्लाकुमार यांना सांगितले. त्यांनी या निवडणुकीत भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्याचेही काम सुरू केले आहे. याविरुद्ध काँग्रेसने श्रेष्ठींकडे अहवाल पोहचविला. मोन्सेरात यांच्या विरोधातही पक्षाने कारवाई करण्याचे ठरविले आहे. निवडणूक निकालानंतर मोठ्या घडामोडी काँग्रेसमध्ये अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’जवळ या वृत्ताला दुजोरा दिला. पक्षाने दोन्ही आमदारांची दखल घेतल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. (खास प्रतिनिधी)