शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2024 17:08 IST

अध्यक्षपदी अक्षय शेट तर सचिवपदी सुदीप नाईक

नारायण गावस

पणजी:  गोवा विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणूक दि. १० जानेवारी २०२४ रोजी पार पडली. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठातील ९ पैकी ८ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.  गोवा विद्यापीठाच्या अध्यक्ष व सचिव पदावर अनुक्रमे अक्षय शेट व सुदीप नाईक विजयी झाले आहेत. तसेच सदस्यपदी मंदार देसाई, शुभम मळीक, आकाश नाईक, सुबेश नाईक गांवकर, प्रभा नाईक आणि मयंक प्रभुदेसाई विजयी झाले आहेत.

नवनिर्वाचित अध्यक्ष अक्षय शेट शिरोडा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. अभाविप चे दक्षिण गोवा जिल्हा संयोजक आहेत. २०१९ पासून अभाविपच्या कामात आहेत. काणकोण शहरमंत्री, दक्षिण गोवा जिल्हा सहसंयोजक अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. 

नवनिर्वाचित सचिव सुदीप नाईक साखळी येथील सरकारी महाविद्यालयात गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. अभाविप उत्तर गोवा जिल्हा संयोजक आहेत. २०१८ पासून अभाविप च्या कामात आहेत. उत्तर गोवा जिल्हा महाविद्यालय प्रमुख अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अभाविप च्या विजयाबद्दल राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल, कोंकण प्रदेश अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.

अभाविप कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की "गोवा विद्यापीठ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विजय ऐतिहासिक आहे. गोव्यातील विद्यार्थी हे राष्ट्रीय विचाराच्या सोबत आहेत. गोव्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभाविप कार्यकर्ते सदैव प्रयत्नशील असतील