शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’कडून मुख्यमंत्र्यांना सात दिवसांची मुदत

By admin | Updated: June 15, 2016 01:43 IST

पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे साडू घन:श्याम मालवणकर यांना काही महिन्यांपूर्वी लाचप्रकरणी पोलिसांच्या

पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे साडू घन:श्याम मालवणकर यांना काही महिन्यांपूर्वी लाचप्रकरणी पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यांना त्या वेळी सरकारने सेवेतून निलंबित केले होते. तथापि, आता पुन्हा घन:श्याम मालवणकर यांना गोवा औैद्योगिक विकास महामंडळात सेवेत रुजू करून घेण्यात आले असल्याने आम्ही याविरुद्ध आंदोलन छेडणार असल्याचे आम आदमी पार्टीचे नेते रूपेश शिंक्रे, प्रदीप घाडी आमोणकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथे सांगितले. मालवणकर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश येत्या सात दिवसांत मुख्यमंत्र्यांनी रद्द करावा. अन्यथा आल्तिनो येथील त्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेऊ, असे आपच्या नेत्यांनी जाहीर केले. येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिंक्रे यांनी सांगितले, की आम्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांचा साडू मालवणकर यांच्या लाचप्रकरणी चौकशी करणारे पोलिस निरीक्षक रापोझ यांची अगोदर सरकारने बदली केली. मग भ्रष्टाचारविरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांचीही मुद्दाम बदली केली. त्यानंतर जे एस.पी. त्या जागी आले, त्यांना मालवणकर प्रकरणी फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते. शिंक्रे म्हणाले, की झिरो टॉलरन्स टू करप्शनच्या गोष्टी सरकार बोलते; पण प्रत्यक्षात स्वत:च्या नातेवाईकांबाबत कसे वागते ते कळून आले आहे. मालवणकर यांची चौकशी न करताच त्यांना पुन्हा सेवेत घेतले गेले आहे.आम्ही येत्या सात दिवसांत सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये याबाबत जागृती करू. आम्ही हा विषय घरोघर पोहोचवू आणि सात दिवसांत मुख्यमंत्र्यांनी सुधारणा केली नाही तर मोर्चा काढू. (खास प्रतिनिधी)