शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचा विश्वास

By किशोर कुबल | Updated: April 18, 2023 15:01 IST

केंद्रीय मंत्री मांडविया हे जी -ट्वेंटी आरोग्य कार्यगटाच्या बैठकीनिमित्त गोव्यात आहेत.

पणजी : जागतिक उद्दिष्टाच्या पाच वर्षे आधी म्हणजेच २०२५ पर्यंत भारत देश क्षयरोगमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी येथे केला.

केंद्रीय मंत्री मांडविया हे जी -ट्वेंटी आरोग्य कार्यगटाच्या बैठकीनिमित्त गोव्यात आहेत. त्यांनी जी -ट्वेंटी  प्रतिनिधींसोबत येथील जनऔषधी केंद्राला (जेनेरिक मेडिसिन आउटलेट) भेट दिली. याप्रसंगी बोलताना मांडविया म्हणाले की, '२०३० च्या जागतिक उद्दिष्टाच्या पाच वर्षे आधीच भारत देश क्षयरोगमुक्त जकरण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत आहे.

जेनेरिक औषधे दर्जेदार व किफायदशीर आहेत. जी ट्वेंटी प्रतिनिधींना 'जेनेरिक मेडिसिन मॉडेल'च्या क्षमतेचे स्पष्टीकरण देताना ते पुढे म्हणाले की, हे मॉडेल अंगिकारु  इच्छिणाऱ्या कोणत्याही देशाला मदत करण्यास भारत तयार आहे.दरम्यान, मंत्री मांडविया यांच्यासोबत प्रतिनिधींनी खोर्ली येथील एबी हेल्थ अँड वेलनेस सेंटरलाही भेट दिली.

भारताच्या पहिल्या मोबाइल बीएसएल-३ लॅबचे प्रात्यक्षिक

दरम्यान, भारताने 'रामबान (रॅपिड अॅक्शन मोबाइल बीएसएल-३ अॅडव्हान्स्ड ऑगमेंटेड) नावाची पहिली मोबाइल बायोसेफ्टी लेव्हल-३ (बीएसएल-३) प्रयोगशाळा सुरू करून वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ही मोबाइल प्रयोगशाळा जी ट्वेंटी बैठकीत प्रदर्शित करण्यात आली. ही प्रयोगशाळा नव्याने उदयास येत असलेल्या  व्हायरल इन्फेक्शन्सची तपासणी करण्यासाठी डिझाइन केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे देशाच्या आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडतील, अशी अपेक्षा आहे.

कोविड महामारीचा सामना करण्यासाठीही ती महत्वाची भूमिका बजावते. चाचणी प्रक्रिया आता सोपी झाली आहे आणि चाचण्या आणि निकाल तयार करण्यात येणारा वेळ कमी केला आहे.  ग्रुप ऑफ ट्वेंटीच्या या बैठकीत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपियन युनियन मधील राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. उद्या बुधवारी बैठकीचा शेवटचा दिवस आहे.

टॅग्स :goaगोवा