शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

चक्क कंन्टेनरमध्ये पोलीस आउटपोस्ट! आमदार संकल्प आमोणकर यांची विधानसभेत माहिती

By वासुदेव.पागी | Updated: July 19, 2023 13:04 IST

मुरगाव येथील पोलीस आउटपोस्टसाठी जागा नसल्यामुळे या आउटपोस्टमधील पोलिसांना कसरती कराव्या लागत आहेत. 

पणजीः कंटेनरमध्ये पोलीस आउटपोस्ट हे ऐकून कुणीही आश्चर्य व्यक्त करील, परंतु गोष्ट खरी आहे. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी ही माहिती विधानसभेत दिली. मुरगाव येथील पोलीस आउटपोस्टसाठी जागा नसल्यामुळे या आउटपोस्टमधील पोलिसांना कसरती कराव्या लागत आहेत. 

आता एक कंन्टेनरमध्येच आउटपोस्ट थाटण्याचे खटाटोप पोलीस करीत असल्याचे आमदार आमोणकर त्यांनी सांगितले.  कारण ज्या जागेत सध्या आउटपोस्ट आहे. ती जागा अत्यंत गैरसोयीची आहे. या तिथे पोलिसांना बसण्यासाठीही सारखी व्यवस्था नाही. त्यामुळे काम करण्याचे वातावरणच त्या ठिकाणी नाही. अशा परिस्थितीतही ते पोलीस काम करतात या बद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच असे ते म्हणाले.  या आउटपोस्टसाठी पोलीस कर्मचारीही अपुरे असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यावर लवकरच जागा पाहुन आउटपोस्ट स्थलांतरीत केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच कुठलीही मोकळी इमारत आमदारांना ठाऊक असल्यास त्याची माहिती द्यावी असे सांगितले. यावर आमदाराने रवींद्र भवनातील काही खोल्या रिकाम्या असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी आउटपोस्ट. स्थलांतरीत केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा