शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ९० टक्के शॅक अनुभवींनाच, बहुप्रतीक्षित शॅक व खनिज डंप धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

By किशोर कुबल | Updated: September 8, 2023 18:49 IST

लोह खनिज डंप हाताळणीसाठी राज्य सरकारच्या डंप धोरणाची प्रतीक्षाही खान व्यावसायिकांना होती.

पणजी : गोव्याच्या किनाय्रांवर पर्यटकांना आकर्षित करणाय्रा शॅकच्या बाबतीत सुसूत्रता आणण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने काल बहुप्रतीक्षित शॅक धोरण २०२३ व त्याच बरोबर खाण व्यवसायिकांसाठी खनिज डंप धोरणाला मंजुरी दिली. नव्या धोरणानुसार ९० टक्के शॅकचे वाटप अनुभवी शॅक व्यावसायिकांना केले जाईल तर १० टक्के शॅक नवीन गोमंतकीय व्यावसायिकांना दिले जातील, जे प्रवेश या व्यवसायात प्रवेश करू इच्छित आहेत.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेची माहिती दिली. ते म्हणाले की, ''नव्या धोरणामुळे या व्यवसायात आता अधिक सुसूत्रता येईल.

लोह खनिज डंप हाताळणीसाठी राज्य सरकारच्या डंप धोरणाची प्रतीक्षाही खान व्यावसायिकांना होती. हे धोरणही मंजूर करण्यात आले.सार्वजनिक तक्रार संचालनालयात एकल फाइल प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजधानी पणजी शहरासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत सांडपाणी नेटवर्क प्रणाली मंजूर करण्यात आली. जुन्या मलनि:सारण वाहिन्या बदलल्या जातील, अशी माहिती बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

कामगार कल्याण केंद्रामध्ये अनुसूचित जाती जमातींच्या प्रशिक्षणार्थींची स्टायपेंड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगे येथे कुणबी हातमाग ग्रामसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून दाराशॉ कंपनीची निवड करण्यात आली आहे. युनिटी मॉलसाठी ग्रामीण विकास यंत्रणेकडून १० हजार चौरस मीटर जमीन पर्यटन विभागाकडे हस्तांतरित केली जाईल. युनिटी मॉल हा प्रत्येक राज्याच्या ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ आणि हस्तकला उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. गोमॅकॉतील वेलनेस औषधालयाची ६३ कोटी रुपयांची प्रलंबित बिले मंजूर करण्यात आली.

टॅग्स :goaगोवा