शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षांनंतर महानंद नाईक पडणार तुरुंगातून बाहेर, पेरोलची अट शिथील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:46 IST

पणजी:  १३ खून प्रकरणात अटक करण्यात आलेला सिरियल कीलर आणि दोन खून प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला क्रूरकर्मा महानंद नाईकचा पेरोलवर तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ लाख रुपये रोख रकमेच्या अटी ऐवजी १ लाख रुपयांच्या हमीच्या अटीवर सोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने परवानगी दिली आहे. १३ ...

पणजी:  १३ खून प्रकरणात अटक करण्यात आलेला सिरियल कीलर आणि दोन खून प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला क्रूरकर्मा महानंद नाईकचा पेरोलवर तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ लाख रुपये रोख रकमेच्या अटी ऐवजी १ लाख रुपयांच्या हमीच्या अटीवर सोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने परवानगी दिली आहे. १३ पैकी दोन खून प्रकरणात जन्मठेप ठोठावण्यात आल्यानंतर गेली ९ वर्षे  तुरुंगात असलेला महानंद नाईक याने पेरोलवर २८ दिवसांची सुट्टी मागितली होती. त्याला पेरोलवर सोडण्यास पोलिसांनी आक्षेप घेतला होता. तुरुंग महानिरीक्षक राजेंद्र मिरजकर यांनी महानंदचा अर्ज विचारात घेताना आणि त्याची तुरुंगातली वागणूक लक्षात घेत २१ दिवसांच्या पेरोलवर त्याला सुट्टी मंजूर केली. ती करतानाच १ लाख रुपये रोख रकमेची हमी देण्याचीही अट ठेवली.परंतु या १ लाख रुपयांच्या अटीसंबंधी सवलत द्यावी, यासाठी खंडपीठाकडे त्याच्या वकिलाने याचिका सादर केली होती. आपल्याजवळ पैसे नसल्यामुळे १ लाख रोख रक्कम देऊ शकत नसल्याचे त्याने खंडपीठाला सांगितले. रक्कम माफ करण्याच्या त्याच्या मागणीला आक्षेप घेताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ते प्रवीण फळदेसाई यांनी त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्याचे आणि दोन खून प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्याचे सांगितले. खंडपीठाने १ लाख रुपयांची हमी कायम ठेवली, परंतु ती रोख स्वरूपात  देण्याची अट मागे घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे २१ दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येण्याचा महानंदचा मार्ग मोकळा झाला आहे. महिलेचा खून करण्याच्या प्रकरणात २००९ रोजी महानंद नाईकला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर एकामागून एक गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या नावावर १३ गुन्हे नोंदले गेले होते. निरीक्षक सी एल पाटील यांनी या प्रकरणात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. ९ वर्षांच्या तुरुंगवासानंतर महानंद पहिल्यांदाच तुरुंगाबाहेर पडणार आहे.