शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ८२ हजार रेशन कार्डे निलंबित; नागरी पुरवठा खात्याची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:29 IST

गोव्यात सहा महिने धान्य न घेणारे रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रेशनवरील धान्य कोटा गेले सहा महिने न उचलणाऱ्यांची रेशन कार्ड निलंबित करण्याची कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत ८२ हजार रेशन कार्ड निलंबित करण्यात आली. नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी यास दुजोरा दिला.

याबाब पार्सेकर म्हणाले की, 'ज्यांची कार्ड निलंबित केली आहेत, त्यांनी महिनाभरात अर्ज करावे लागतील. कारण द्यावे लागेल आणि केवायसी प्रक्रियाही पूर्ण करावी लागेल. यात १० हजार कार्ड अशी आहेत, की ती कुटुंबे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांमधील आहेत. दरम्यान, जे सरकारी कामाला आहेत आणि एएचएच किंवा एएवाय अति गरिबांसाठीची रेशन कार्ड घेतलेली आहेत. त्यांच्यावरही कारवाई होणार आहे, कार्ड बदलून एपीएल कार्ड घेण्यासाठी त्यांना काही अवधी दिला जाईल. रेशन कार्डवर महिन्याचा धान्य कोटा न उचलणाऱ्यांची कार्ड १ फेब्रुवारीपासून निलंबित केली जातील, असे जाहीर करण्यात आलेहोते. कार्डाचे निलंबन उठवण्यासाठी अन्नधान्य कोट्याचा लाभ न घेतल्याच्या वैध कारणासह अर्जासह तालुका नागरी पुरवठा कार्यालयाकडे जावे लागेल. खुल्या बाजारात न उचललेल्या अन्नधान्याच्या कथित विक्रीला आळा घालण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे.

काळाबाजार रोखणार

अलीकडेच धान्य तस्करीचे उघडकीस आलेले प्रकरण तसेच तूरडाळ गोदामात सडविल्याचे व त्यामुळे दोन ते तीन कोटी रुपयांची नुकसानी झाल्याचे प्रकरण व १० मेट्रिक टन साखर गोदामात वितळल्याचे प्रकरण या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला आहे. रेशन दुकानांवरून न उचललेल्या धान्याचा काळाबजार होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा