शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पर्यटन सुरू होताच ८१ व्यक्तींना बुडताना वाचवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 21:30 IST

उत्तर गोव्यातील कळंगुट, सिकेरी, आश्वे, केरी सर्वाधिक घटना

- सदगुरू पाटीलपणजी : राज्यात पर्यटन मोसम सुरू होताच, समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक किंवा स्थानिक लोक बुडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मात्र गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या ६० घटनांवेळी एकूण ८१ व्यक्तींना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. यात बहुतांश पर्यटक आहेत.उत्तर गोव्यातील कळंगुट, सिकेरी, आश्वे, केरी आदी किनाऱ्यांवर अनेक घटना घडल्या. तसेच दक्षिण गोव्यातील पाळोळे आदी किनाऱ्यांवर गेल्या दोन आठवड्यांमध्ये साठ घटना घडल्याचे जीवरक्षकांचे म्हणणे आहे. एक-दोघांना आत्महत्त्या करताना वाचविले गेले. बार्देश तालुक्यातील जगप्रसिद्ध किनाऱ्यांपासून दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांपर्यंत सर्वत्र एकूण लाखो पर्यटक गेल्या दोन आठवड्यांत येऊन गेले. रुपेरी वाळूचे गोव्यातील किनारे पर्यटकांना मोहात पाडतात. येथील फेसाळत्या लाटांशी खेळण्याचा मोह पर्यटक आवरत नाहीत. काहीजण तर मद्य पिऊन पाण्यात उतरतात व मग मृत्यूच्या दाढेत ओढले जातात. नाताळ सण व नववर्ष साजरे करण्यासाठी लाखो पर्यटक गोव्यात येऊन गेले. अजूनही काही देशी पर्यटक गोव्यात आहेत. गेल्या दोन आठवड्यात एक-दोघांचा बुडून मृत्यूही झाला.दि. १ जानेवारीपासून ३५ व्यक्तींना किनाऱ्यांवर वाचविले गेले. काहीजणांना किनाऱ्यांवर आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली. अशा चार व्यक्तींना वाचविले गेले. रुग्णवाहिका वगैरे बोलावून त्यांना वैद्यकीय मदत पुरविली गेली. पस्तीस देशी पर्यटकांना बुडताना वाचविले गेले. हरवलेल्या मुलांचाही छडा किनाऱ्यांवर लागला. दि. ३१ डिसेंबर ते दि. ३ जानेवारीपर्यंत एक ते पाच वर्षांची काही मुले किनाऱ्यांवर सापडली. तीन घटनांमध्ये हरवलेल्या मुलांची पुन्हा पालकांशी भेट झाली, असा जीवरक्षकांच्या दृष्टी यंत्रणेचा दावा आहे. दरम्यान, कळंगुट, कांदोळी, वागातोर केळशी अशा समुद्रात आज सोमवारी चार घटना घडल्या. सतराजणांचा गट कळंगुट येथे पोहत होता. त्यापैकी सोळा ते वीस वयोगटातील तिघेजण समुद्रात वाहून जाऊ लागले. त्यांना जीवरक्षकांनी वाचविले. तसेच वागातोर येथे बारा वर्षांहून कमी वयाच्या दोघा मुलांना बुडताना वाचविले गेले.