शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

गोव्यात सुरू करणार ७२ नवीन पेट्रोलपंप, डीलरशीपसाठी मागविले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 19:05 IST

इंडियन आॅयल कॉर्पोरेशन लिमिटेड राज्यात नवीन ७२ नवीन पेट्रोलपंप सुरू करणार असून त्यासाठी इच्छुकांकडून कॉर्परेशनने अर्ज मागविले आहेत.

ठळक मुद्देइंडियन आॅयल कॉर्पोरेशन लिमिटेड राज्यात नवीन ७२ नवीन पेट्रोलपंप सुरू करणार सध्या राज्यात उपलब्ध असलेले  पेट्रोलपंप हे लोकांची मागणी पूर्ण करण्यास अपुरे पडत आहेत. किमान  १७७  नवीन पेट्रोलपंपची गरज आहे

पणजी  - इंडियन आॅयल कॉर्पोरेशन लिमिटेड राज्यात नवीन ७२ नवीन पेट्रोलपंप सुरू करणार असून त्यासाठी इच्छुकांकडून कॉर्परेशनने अर्ज मागविले आहेत. इतक्या प्रमाणात अधिक पेट्रोलपंपची सध्या गोव्यात गरज असल्याचेही कॉर्पोरेशनने म्हटले आहे. या विषयी माहिती देताना कॉर्पोरेश्नचे राज्यस्तरीय समन्वयक नीरज राठोड यांनी सांगितले की, महामंडळाकडून राज्यातत सर्वत्र सर्व्हेक्षण करून पेट्रोलच्या वाढत्या मागणीची आणि व उपलब्ध पुरवठ्याचा अभ्यास केला.  सध्या राज्यात उपलब्ध असलेले  पेट्रोलपंप हे लोकांची मागणी पूर्ण करण्यास अपुरे पडत आहेत. किमान  १७७  नवीन पेट्रोलपंपची गरज आहे.  हे पेट्रोलपंप महामार्गावर तसेच राज्यांतील हमरस्त्यांजवळही हवे आहेत. पेट्रोल व डिजलची मागणी वढत आहे. देशाची पेट्रोलची मागणी ही सरासरी ४ टक्क्यांनी वाढत आहे तर गोव्याची मागणी ही ८ टक्क्यांनी म्हणजे दुप्पट प्रमाणात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा हे जागतीक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असल्यामुळे तसेच इतर बाबतीतही गोव्याची प्रगती झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोलची मागणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. कॉर्परेशनच्या सर्वोक्षणानुसार सर्व १७७ ठिकाणी पेट्रोलपंप सुरू केल्यास ते फायद्यात चालू शकतात, परंतु तूर्त ७२ पेट्रोलपंपच्या डिलरशीपसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नवीन पेट्रोलपंपसाठी इच्छुकांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज  करावे लागतील. जमीनीची उपलब्धता हा सर्वात महतत्वाचा निकष आहे. एकूण जागेची आवश्यकता व इतर आवश्यक पत्रांची माहिती कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. अर्जची प्रक्रियाही अत्यंत सोपी व सुटसुटीत करण्यात आली आहे. भांडवल व जागा या विषयी माहिती देण्यापूर्वीही अर्ज करण्याची सवलत देण्यात आली आहे. इतर माहिती नंतर देण्याची मुभा आहे. तसेच जास्तीत जास्त वय हे ५५ वर्षांवरून वाढवून ६० वर्षे करण्यात आले आहे.  असे राठोड यांनी सांगितले.  या पत्रकार परिषदेला इंडियन आॅईलचे ज्येष्ठ व्यवस्थापक सुरेश धुरी, विभागीय व्यवस्थापक जी मंजुनाथ आणि क्षेत्रीय व्यवस्थापक दिनेश ढोकने उपस्थित होते.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपgoaगोवा