शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलर वाहनाच्या चाकाखाली सापडून ६० वर्षीय महीला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 19:27 IST

दक्षिण गोव्यातील वेर्णा येथील ‘टायटन जंक्शन’ समोर ट्रेलर या अवजड वाहनाबरोबर झालेल्या अपघातात ६० वर्षीय डोनेता डी’सोझा या वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

वास्को: पतीसहीत दुचाकीने जात असताना दक्षिण गोव्यातील वेर्णा येथील ‘टायटन जंक्शन’ समोर ट्रेलर या अवजड वाहनाबरोबर झालेल्या अपघातात ६० वर्षीय डोनेता डी’सोझा या वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी अंत झाला. जॉन डी’सोझा त्याची पत्नी डोनेता हीला घेऊन एक्टिव्हा दुचाकीने जात असताना याच मार्गावरून जात असलेल्या ट्रेलर वाहनाला (दोन्ही वाहने एकाच दिशेने जात होती) बाजूने त्यांच्या दुचाकीची धडक बसल्याने डोनेता रस्त्यावर पडल्यानंतर ट्रेलर वाहनाचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली.वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी (दि. ८) सकाळी ११.१० च्या सुमारास सदर अपघात घडला. कुठ्ठाळी चर्च मार्ग परिसरात राहणारा ६३ वर्षीय जॉन डी’सोझा त्याची पत्नी डोनेता डी’सोझा हीला घेऊन एक्टीव्हा दुचाकीने (क्र: जीए ०६ व्हाय १९३७) वेर्णाच्या दिशेने जात होता. दुचाकीने जाताना जेव्हा जॉन व त्याची पत्नी वेर्णा येथील ‘टायटन जंक्शन’ समोर पोचली तेव्हा याच मार्गाने जाणाऱ्या ट्रेलर (क्र: एमपी ३९ एच ३२८४) या अवजड वाहनाला त्यांच्या दुचाकीची बाजूने धडक बसल्याने जॉन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत पडल्याने तो किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला, मात्र डोनेता रस्त्यावर पडल्याने ट्रेलरचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. वेर्णा पोलिसांना सदर अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन अपघाताचा तसेच मृत डोनेता हिच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात पाठवून दिला.अपघातात सापडलेल्या ट्रेलर वाहनाचा चालक रतनलाल सूतार (वय ५८, उदयपूर - राजस्थान) यास वेर्णा पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. वेर्णा महामार्गावर शनिवारी सकाळी डोनेता डी’सोझा हीचा असा दुर्देवी अंत झाल्याने तिच्या कुटूंबावर तसेच शेजा-यात दुःखाचे वातावरण पसरलेले आहे. डोनेता हीचा पती जॉन या अपघातातून किरकोळ जखमा होऊन सुखरूप बचावल्याची माहिती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रियंका नाईक अधिक तपास करीत आहे.