शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

लॉकडाऊननंतर गोव्यात पुन्हा एकदा ड्रग्सचा सुळसुळाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 13:25 IST

ड्रग्स येण्याचा कर्नाटक नवीन मार्ग; आठ महिन्यात 54 लाखांचा माल जप्त

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव : आंतरराष्ट्रीय ड्रग्स डेस्टिनेशन अशी ओळख प्रस्थापित केलेल्या गोव्यात लॉकडाऊनाच्यावेळी अमलीपदार्थ येण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र ऑगस्टमध्ये राज्याच्या सीमा खुल्या झाल्यानंतर पुन्हा या व्यवसायाने जोर धरला असून हे ड्रग्स गोव्यात येण्याचा मुख्य मार्ग सध्या कर्नाटक झाले आहे. त्याशिवाय गोव्यातही गांजाची पैदास करण्याची तीन प्रकरणे उघडकीस आली आहेत.

बुधवारी पेडणेचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे तीन लाखांचा गांजा पकडला होता. त्यापैकी एका प्रकरणात हरमल या भागातच गांजाची लागवड केली जात असल्याचे उघडकीस आले होते. त्याआधी 5 ऑक्टोबर रोजी  पेडणे तालुक्यातीलच मांद्रे या गावात दोन रशियन नागरिकाना आपल्या घरातच गांजाची लागवड करत  असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी गोव्याच्या सीमेवर कारवार भागात कर्नाटक पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करून त्यांच्याकडून 1 किलो गांजा पकडला होता. गोव्यात सीमा खुल्या झाल्याने पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळेच आता  ड्रग्सही गोव्यात मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत अशी माहिती मिळत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते आतापर्यंत गोव्यात ड्रग्स विषयक एकूण 38 प्रकरणाची नोंद झाली असून त्यात 54.29 लाख रुपयांचा माल पकडला गेला. यातील बहुतेक प्रकरणे गांजाशी निगडित आहेत. गोव्यात येणारे देशी पर्यटक आणि स्थानिकामध्ये सिंथेटीक ड्रग्सपेक्षा गांजालाच अधिक मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर गांजा गोव्यात आणला जात आहे. आतापर्यंत मागच्या आठ महिन्यात गोव्यात ड्रग्स व्यवहारात असलेल्या 42 जणांना अटक करण्यात आली असून त्यात 15 स्थानिक, 21 भारतीय तर 6 विदेशी व्यक्तींचा समावेश आहे.

उपलब्द आकडेवारीवर लक्ष घातल्यास ज्यावेळी गोव्यात लोकांच्या हालचालीवर निर्बंध होते त्यावेळी म्हणजे एप्रिल ते जून या तीन महिन्यात गोव्यात ड्रग्स संदर्भात केवळ 6 प्रकरणेच नोंद झाली होती आणि या कालावधीत 10.65 लाखांचा माल पकडला होता. पण जुलै महिन्यात सीमा खुल्या झाल्यानंतर  पुन्हा एकदा या अवैध व्यवसायाने आपले तोंड वर काढले आहे. जुलै महिन्यात 5.92 लाख रुपये, ऑगस्ट महिन्यात 19 लाख, सप्टेंबर महिन्यात 10.04  लाख तर ऑक्टोबरच्या पहिल्या 15 दिवसांतच 8.68 लाखांचा माल पकडला आहे.

पर्यटन व्यवसायात असलेल्या एका व्यावसायिकाने आपले नाव न उघड करण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना सांगितले, ही आकडेवारी फक्त पकडण्यात आलेल्या ड्रग्सची गोव्यात आत येऊनही न पकडण्यात आलेला माल या पेक्षा 9 पटीने अधिक असेल.

वास्तविक गोव्यात गांजा महाराष्ट्रमार्गे येतो पण यावेळी लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात सीमावर कडक पहारा असल्याने सुरवातीला गोव्यातच करणाऱ्या लागवडीवर हा व्यवसाय चालविला गेला मात्र आता कर्नाटक मार्गे हा ड्रग्स गोव्यात येऊ लागला असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनच्या काळात म्हणजे 3 मे रोजी गोव्यात साखवाळ येथे स्थानिक पोलिसांनी धाड घालून एका स्थानकाला अटक केली असता तो आपल्या घराजवळच  गांजाची लागवड करत असल्याचे उघड झाले होते.

सध्या गोव्यात पोळे आणि मोले या दोन मार्गातून गांजा गोव्यात येतो अशी माहिती असून चार दिवसांपूर्वी मोले मार्गे असाच मोठा साठा आला होता.  सोमवारी पोळ्यातून गांजा आणण्याचा प्रयत्न झाला होता . पण कारवार पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो सफल होऊ शकला नाही. कारवार पोलिसांनी ज्या तिघांना अटक केली होती त्यातील दोन संशयित काणकोणमधील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.