शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

गोव्यातील ५१ अमरनाथ यात्रेकरु काश्मिरात अडकले

By admin | Updated: July 10, 2016 20:26 IST

अमरनाथला गेलेले गोव्याचे ५१ यात्रेकरु तेथील हिंसाचारामुळे गेले तीन दिवस काश्मिरमध्ये अडकून पडले आहेत. यात चार कुटुंबांसह १५ वर्षीय मुलाचाही समावेश आहे.

- चार कुटुंबांसह १५ वर्षीय मुलाचाही समावेश पणजी : अमरनाथला गेलेले गोव्याचे ५१ यात्रेकरु तेथील हिंसाचारामुळे गेले तीन दिवस काश्मिरमध्ये अडकून पडले आहेत. यात चार कुटुंबांसह १५ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. काश्मिरात दहा हजाराहून अधिक यात्रेकरु अडकल्याचे सांगितले जाते. गोव्याचे ५१ यात्रेकरु सध्या श्रीनगर येथे बस डेपोत आश्रयाला असून तेथे लष्कराकडून सुरक्षेचा पूर्ण बंदोबस्त करण्यात आलेला आहे. दिल्लीतील यात्रेकरुंचा भंडारा तेथे चालू असून तेथेच गोव्याचे हे यात्रेकरु भोजन घेत आहेत. काश्मिरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा कमांडर बरहान वानी याला ठार केल्यानंतर उसळलेल्या दंगलीत यात्रेकरुंच्या वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडलेले आहेत. सर्व रस्ते बंद झालेले आहेत. बस डेपो सोडून बाहेर जाण्यास लष्कराची परवानगी नाही. पुढेही जाऊ शकत नाही आणि मागेही अशा स्थितीत गोव्याचे हे यात्रेकरु अडकलेले आहेत.

उदय पेडणेकर, शिवराम गांवकर,भरत कावा, बेहराम चौधरी, शंतनू गौशियन, सुबोध आमोणकर, अनिल राजपुरोहित, कानाराम चौधरी, वल्लभ नाईक आदी गोमंतकीय यात्रेकरुंचा समावेश आहे. भाविक अडकल्याचे वृत्त रविवारी गोव्यात वाऱ्यासारखे पसरले आणि येथील नातेवाईकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी मोबाइलवरुन संपर्क साधून विचारपूस केली. अडकलेल्यांशी रेंजअभावी संपर्क होत नव्हता त्यामुळे नातेवाईकांच्या चिंतेत आणखी भर पडली.

खासदार सावईकर यात्रेकरुंच्या संपर्कात दरम्यान, श्रीनगरमध्ये अडकलेले गोमंतकीय यात्रेकरु सुखरुपरित्या परत यावेत यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर जातीने लक्ष ठेवून आहेत. संरक्षण मंत्रालय माहिती घेत आहे. आपणही याबाबतीत यात्रेकरुंशी संपर्क साधून ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्याची कल्पना त्यांना दिलेली आहे, असे सायंकाळी उशिरा दक्षिण गोव्याचे लोकसभा खासदार नरेंद्र सावईकर यानी स्पष्ट केले.