शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ४० नव्या शाळांना परवानगी शक्य

By admin | Updated: March 19, 2017 02:08 IST

पणजी : राज्यात ४० नव्या प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याकडे विविध शैक्षणिक संस्थांचे अर्ज आले आहेत. त्या अर्जांची

पणजी : राज्यात ४० नव्या प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याकडे विविध शैक्षणिक संस्थांचे अर्ज आले आहेत. त्या अर्जांची दखल घेऊन शिक्षण खात्याने सर्व भाग शिक्षणाधिकाऱ्यांना शक्याशक्यता तपासून पाहण्याची सूचना केली आहे. येत्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाग शिक्षणाधिकाऱ्यांचे अहवाल आल्यानंतर शिक्षण खाते या ४० शाळांसाठी परवानगीच्या अर्जांबाबत निर्णय घेणार आहे. शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी शनिवारी ‘लोकमत’ला सांगितले, की चौदा मराठी, तेरा कोकणी, सात इंग्लिश व काही उर्दू मिळून एकूण चाळीस शाळा विविध तालुक्यांमध्ये सुरू करण्यासाठी अर्ज आले. आम्ही या अर्जांचा अभ्यास केला व भाग शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल मागितले आहेत. कुठे सरकारी शाळा अगोदरच आहे व कुठे शाळांची संख्या कमी पडते किंवा कुठे नव्या शाळांची गरज नाही, हे सगळे भाग शिक्षणाधिकारी तपासून पाहतील. दोन शाळांमधील अंतरही पाहिले जाईल. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ व मग तिसऱ्या आठवड्यात सर्व अर्जदार संस्थांना आमचा निर्णय कळवू.दरम्यान, सर्व शिक्षा अभियानावर या वेळी एकूण ४३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यापैकी ३३ कोटी रुपये केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केले आहेत. बारा कोटींचा खर्च राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानावर केला जाणार आहे. शिक्षकांच्या शिक्षणासाठी कार्यक्रम राबविण्यावर दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. माध्यान्ह आहाराची जोडणी आता इंटिग्रेटेड वॉइस रिस्पॉन्स सिस्टमशी केली जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे कोणत्या विद्यालयात किती विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार म्हणून किती प्रमाणात कोणते पदार्थ दिले गेले ते या पद्धतीमुळे शिक्षण खात्याला आणि केंद्रीय शिक्षा मंत्रालयालाही कळून येणार आहे. तिसवाडी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण खात्याने हे काम सुरू केले आहे. माध्यान्ह आहार योजनेसाठी ८१ मदतनीस केंद्राने मंजूर केले आहेत.(खास प्रतिनिधी)