शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ३२८ कोटींच्या वीज निविदा; प्रक्रियेला लोकायुक्तांकडून स्थगिती

By admin | Updated: October 7, 2016 17:31 IST

वीज खात्यातील ३२८ कोटी रुपयांच्या दोन निविदांच्या प्रक्रियेला लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी स्थगिती दिली असून कंत्राटे बहाल करु नयेत, असे आदेश दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 07 - वीज खात्यातील ३२८ कोटी रुपयांच्या दोन निविदांच्या प्रक्रियेला लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी स्थगिती दिली असून कंत्राटे बहाल करु नयेत, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणात मुख्य सचिव, वित्त सचिव, वीज सचिव आणि खात्याच्या मुख्य अभियंत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पुढील सुनावणी येत्या १७ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.  
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनिल कवठणकर यांनी गेल्या २६ आॅगस्ट रोजी लोकायुक्तांकडे वीजमंत्री मिलिंद नाईक, मुख्य सचिव तसेच वित्त सचिव आणि खात्याच्या मुख्य अभियंत्याविरुध्द या घोटाळ्यासंबंधी तक्रार सादर केली होती. उच्च दाबाच्या आणि कमी दाबाच्या सब ट्रान्समिशन इलेक्ट्रिकल कामासाठी १५६ कोटी ५0 लाख रुपयांची निविदा अंदाजित खर्चापेक्षा १७ टक्के जास्त रकमेने बहाल केल्याचा त्यांचा आरोप आहे.
                        
मेसर्स व्होल्टास लि, मुंबई, मेसर्स केइआय इंडस्ट्रीज, गुरगांव आणि मेसर्स लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, चेन्नई या तीन कंपन्यांनी आॅनलाइन निविदा भरल्या. वास्तविक टेक्नो कमर्शियल निविदा उघडल्यानंतरच वित्तीय निविदा उघडल्या जातात मात्र ज्या दिवशी टेक्नो कमर्शियल निविदांचे मूल्यांकन चालू होते त्याच दिवशी म्हणजे २३ मार्च २0१६ रोजी संकेतस्थळावर वित्तीय निविदांमध्ये लावलेली बोलीही झळकली त्यामुळे खळबळ माजली. संकेतस्थळावर जे झळकले त्यानुसार वरील तीन कंपन्यांनी अनुक्रमे १८५ कोटी ८0 लाख रुपये, १८६ कोटी २८ लाख रुपये  व १८६ कोटी ६३ लाख रुपये अशी बोली लावली होती. मेसर्स व्होल्टासची कमीत कमी बोली असतानाही अर्धवट असल्याचे कारण देऊन या कंपनीची निविदा फेटाळण्यात आली आणि तिसºया स्थानी असलेल्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीला कंत्राट बहाल करण्यात आले. तसेच केइआय इंडस्ट्रीजचे तोंड बंद करण्यासाठी नंतर १४२ कोटी रुपये कामाचे अन्य एक कंत्राट या कंपनीला देण्यात आले. यातही घोटाळा झाल्याचा आरोप कवठणकर यांनी केला आहे. 
 
या दोन्ही निविदांच्याबाबतीत चौकशी केली जावी तसेच फेरनिविदा काढण्याचा आदेश दिला जावा, कंत्राट बहाल करण्यात वशिलेबाजी केल्याने संबंधितांविरुध्द गुन्हे नोंदविले जावेत. या याचिकेवरील निवाडा येईपर्यत जैसे थे स्थिती ठेवावी, अशी मागणी कवठणकर यांनी लोकायुक्तांकडे केली होती.