शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

‘मगोप’ लढवणार २८ जागा!

By admin | Updated: December 31, 2016 03:20 IST

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीवेळी मगो पक्ष एकूण २८ जागा लढवणार आहे. २२ मतदारसंघांमध्ये आम्ही उमेदवार निवडले

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीवेळी मगो पक्ष एकूण २८ जागा लढवणार आहे. २२ मतदारसंघांमध्ये आम्ही उमेदवार निवडले असून २८ जागा वगळता उर्वरित १२ जागांबाबत अन्य पक्षांच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे ‘मगोप’चे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. वास्कोचे माजी नगराध्यक्ष मनेष आरोलकर यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी मगो पक्षात प्रवेश केला. आरोलकर यांचे स्वागत केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ढवळीकर म्हणाले की, एकदा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की अनेकजण मगो पक्षात प्रवेश करतील. वाळपई मतदारसंघातदेखील आम्ही उमेदवार निवडला आहे. तो मतदारसंघही मगोप लढवणार आहे. आमच्याकडे अनेक युवा व नवे उमेदवार आहेत. दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या आयातीची आम्हाला गरज नाही. सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचसोबत मगोपची युती होईल काय, असे पत्रकारांनी विचारले असता, सुरक्षा मंचसोबत चर्चा सुरू आहे. युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय लवकरच होईल. आमचे व त्यांचे काही विषय आहेत, त्याबाबत अगोदर तोडगा काढावा लागेल. सासष्टी तालुक्यातील मतदारसंघांतही आमचे उमेदवार असतील. बारा जागांबाबत अन्य पक्षांच्या उमेदवारांचा विचार आम्ही करू शकू. मगो पक्ष हा कूळ-मुंडकारांचा व गरिबांचा पक्ष आहे व त्यामुळेच नवे तरुण या पक्षात येत आहेत. ढवळीकर म्हणाले की, भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. पर्रीकर हे माझे मित्र आहेत; पण भाजपला ‘मगोप’ची गरज नाही; कारण त्यांचे २६ उमेदवार निवडून येतील, असे भाजपला वाटते. त्यामुळे निवडणूक होऊ द्या. मगो पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल, असे मला वाटते. लोक आमच्यासोबत आहेत, हे म्हार्दोळ येथील महालसा मंदिरात प्रचाराचा नारळ ठेवतानाही दिसून आले. त्या वेळी साडेचार हजार ‘मगोप’प्रेमी जमले होते. आम्ही कुणाशीच युती न करता निवडणुकीस स्वतंत्रपणे सामोरे जावे, असे २५ टक्के गोमंतकीयांना वाटते. आम्हाला भाजपने मंत्रिमंडळातून काढले ते बरे झाले; कारण त्या वेळपासूनच मगो पक्षाची ताकद वाढली व लोकांच्या अपेक्षाही ‘मगोप’कडून वाढल्या. गोव्यात सध्या २० हजार कोटींची जी रस्ता, पूलविषयक कामे सुरू आहेत, ती मी गडकरी व पर्रीकर यांच्या सहकार्याने मार्गी लावली. (खास प्रतिनिधी)