शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कळंगुट परिसरात २८ दलाल ताब्यात

By काशिराम म्हांबरे | Updated: April 29, 2023 16:10 IST

कारवाईसाठी पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.

म्हापसा- कळंगुट परिसरातील किनाºयावर येणाºया पर्यटकांना लुटणाºया त्यांची फसवणुक करणाºया दलालांवर कारवाई करून २८ दलालांना ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. उत्तर गोव्याचे अधिक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली तसेच पर्वरीचे उपअधिक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत वाळपई, आगशी तसेच कोलवाळ स्थानकाच्या निरीक्षकांनी भाग घेतला होता.

कारवाईसाठी पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.  यात कळंगुटसोबत डिचोली, वाळपई तसेच इतर स्थानकावरील ६० हून अधिक पोलिसांचा समावेश करण्यात आला होता. कळंगुट परिसरातील विविध भागात दलालांवर देखरेख ठेवण्यासाठी या सर्व पोलिसांना साद्या वेषात मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी सुरु झालेली ही मोहिम रात्री उशारी पर्यंत सुरुच होते.  यावेळी कळंगुट परिसरात येणाºया पर्यटकांना स्वत:कडे आकर्षीत करून त्यांना विविध प्रकारची आमीषे दाखवण्याच्या प्रयत्नात असताना या सर्व दलालांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या दलालातील बहुतेक दलाल हे इतर राज्यातील पण गोव्यात वास्तव्य करून राहणारे होते. यात कर्नाटक, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, राजस्थान, ओडिसा, हरयाणा, उत्तराखंड, मेघालय सारख्या राज्यातील होते.

ताब्यात घेण्यात आलेल्या या दलालांना नंतर कळंगुट पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले त्यांच्या विरोधात पर्यटन व्यवसाय कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यात आला. नंतर  सर्वांना पुढील कार्यवाहीसाठी पर्यटन खात्यात हजर करण्यात आले. कळंगुट तसेच कांदोळी बागा सिकेरी येथील किनारी भागात पर्यटकांची दलालांकडून होणाºया फसवणुकी संबंधीच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. स्तानीकांनी, पर्यटनाशी निगडीत व्यवसायिकांनी या दलालांवर कारवाईची मागणी केली होती. स्थानीक पंचायतीकडून मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसेच पर्यटन मंत्र्यांना निवेदनही सादर केले होते. अशा प्रकारची कारवाई या पुढेही सुरुच राहणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली

टॅग्स :goaगोवा