शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

अडीच वर्षांत गोव्यात तब्बल 262 विदेशी गुन्हेगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 18:41 IST

अंमलीपदार्थ व एटीएममधून पैसे चोरण्याच्या घटनात गोव्यात येणा-या विदेशी नागरिकांचा हात मोठय़ा प्रमाणावर असल्याचे दिसून आले आहे.

मडगाव: अंमलीपदार्थ व एटीएममधून पैसे चोरण्याच्या घटनात गोव्यात येणा-या विदेशी नागरिकांचा हात मोठय़ा प्रमाणावर असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीप्रमाणो मागच्या अडीच वर्षात तब्बल 262 विदेशी नागरीक गोव्यात गुन्हेगारीशी संबंधित असल्याचे उघडकीस आले आहे.पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, बहुतेक विदेशी नागरिकांवर अंमली पदार्थाच्या व्यवसायात सामील असल्याचे गुन्हे नोंद असून काही जणांवर वेश्या व्यवसायातही सहभागी असल्याचे गुन्हे नोंद झाले आहेत. गोव्यात येणा-या विदेशी पर्यटकावर मोठय़ा प्रमाणावर अत्याचार होतात असे जरी चित्र उभे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मागच्या अडीच वर्षात गुन्ह्य़ातील पीडित असलेल्या विदेशी नागरिकांची संख्या केवळ 40 आहे. त्या उलट गुन्हेगारीत समावेश असलेल्या विदेशी नागरिकांची संख्या 262 एवढी आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गोव्यात गुन्हेगारी प्रकरणात अटक केलेल्या विदेशी नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नायजेरियनांचा समावेश असून त्या पाठोपाठ तांझानियन आणि रशियनांचा समावेश आहे. यातील नायजेरियन व रशियन हे मुख्यत: अंमलीपदार्थ व्यवहार आणि वेश्या व्यवसाय अशा गुन्हय़ात सामील आहेत तर रोमानियन नागरीक एटीएम चो:यात अधिक सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय गोव्यात तांझानियन मोठय़ा प्रमाणावर बेकायदा वास्तव करुन राहिल्याचेही उघड झाले आहे. दरवर्षी गोव्यात सात लाखांच्या आसपास विदेशी नागरीक गोव्यात येत असतात. यातील 90 टक्के विदेशी नागरिक पर्यटक म्हणून गोव्यात येत असतात. मात्र त्यातील कित्येक बेकायदेशीररित्या गोव्यातच वास्तव करून राहतात.आतापर्यंत गोव्यात अटक केलेल्या नागरिकांमध्ये इराण, युके, इज्रायल, केनिया, रशिया, घाना, तांझानिया, जर्मनी, नायजेरिया, स्वीडन, युगांडा, नेपाळ, जॉर्जिया, इटली,चेकोस्लोव्हाकिया, रोमानिया, अफगाणिस्तान, फ्रान्स, जॉर्डन, ऑसिया, टर्की, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, येमेन व आयवरी कोस्ट येथील नागरिकांचा समावेश आहे. चालू 2019 वर्षी आतार्पयत 66 विदेशी नागरिकांना गुन्हेगारी प्रक़रणात अटक करण्यात आली असून 2017 साली हे प्रमाण 70 होते. 2018 साली तो आकडा 126 र्पयत वाढला होता. या घटनांमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे, गोव्यातील एटीएमना स्किमिंग मशिन लावून त्याद्वारे लोकांना लाखोंचा फटका घालणा:या रोमानियनांच्या टोळय़ांचा उच्छाद गोवा पोलिसांनी उघडकीस आणला होता.