शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भामट्यांकडून दोघांना २६.0९ लाखांना गंडा

By admin | Updated: March 9, 2017 02:15 IST

पणजी : कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसाची आमिषे दाखवून गंडविण्याचे प्रकार गोव्यात सुरूच आहेत. मडगाव येथील एका वृद्धाकडून १७.९३

पणजी : कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसाची आमिषे दाखवून गंडविण्याचे प्रकार गोव्यात सुरूच आहेत. मडगाव येथील एका वृद्धाकडून १७.९३ लाख रुपये,  तर कवळे-फोंडा येथील गृहस्थाला आयकर अधिकारी असल्याचे सांगून ८.१६ लाखांना गंडा घातल्याची दोन प्रकरणे रायबंदर येथील सायबर  गुन्हा विभागाकडे नोंद झाली आहेत.पहिल्या प्रकरणात मडगाव येथील सर्कन्सियासो फर्नांडिस (७१) या वृद्धाला ३.१५ कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याची माहिती फोनवरून देऊन त्याच्याकडून शुल्काच्या निमित्ताने आणि विविध करांच्या रूपाने मिळून १७.९३ लाख रुपये उकळले. हे पैसे त्याने संशयिताने दिलेल्या विविध खात्यांत जमा केले. एकूण २५वेळा ही रक्कम जमा करण्यात आली, असे फर्नांडिस यांची पत्नी कॅथरिन यांनी तक्रारीत म्हटले आहे. फोनवरून आणि ईमेलवरून संशयित त्यांच्याशी संपर्कात होते. संशयितांकडून पैसे मागणे चालूच राहिल्यामुळे त्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पती वृद्ध असल्यामुळे प्रवास करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या वतीने आपण स्वत: तक्रार देत असल्याचे कॅथरिन यांनी तक्रारीत म्हटले आहे.दुसऱ्या प्रकरणात कवळे-फोंडा येथील विनायक पेंडसे नामक गृहस्थाला अज्ञातांनी फोन केला. बँकेचे आयकर खात्याचे अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांच्या बँक खात्याची आणि एटीएमची माहिती घेतली. ते सांगतानाच विनायक यांनी यापूर्वी केलेल्या अंतिम व्यवहाराची माहिती त्यांना दिली. एटीएमचा पीन क्रमांक कुणालाही सांगू नका, असे सांगून संशयिताने त्यांचा विश्वास संपादन केला; परंतु नंतर पीनची माहिती मिळवून पेंडसे यांच्या खात्यातून एका दिवसात ८.१६ लाख रुपये काढले. (प्रतिनिधी)