शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचा ट्रक देवून फेडले उधारीचे २५ लाख, त्रिकुटाची करामत

By सूरज.नाईकपवार | Updated: June 1, 2023 20:51 IST

एकास अटक, मालकाला मन:स्ताप

मडगाव : आपली २५ लाख रुपयांची उसनवारी फेडण्यासाठी तिघांनी नामी शक्कल लढविताना पंजाबमधून भाडे घेवून आलेला एक ट्रक आर्ले-नुवे बायपासवरून चोरला. ज्याची उधारी द्यायची आहे, त्याला ट्रकसह एक कार सुपूर्द केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी कुंकळ्ळी येथील सुनील दत्त याला अटक केली असून, चोरीला गेलेला ट्रकही जप्त केला आहे. चोरी करणाऱ्या त्रिकुटाचा शोध सुरू आहे. या प्रकरणात परतीचे भाडे मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालकास नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. 

पोलिसांनी सांगितले की, पंजाब येथून एकजण दहा टायरचा ट्रक घेऊन प्लायवूडची डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. ट्रकचालक भागचंद्र नाथ राम याने महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये  मालाची डिलिव्हरी केल्यानंतर गोव्यातून काही भाडे मिळेल का? हे पाहण्याचे ठरवले. १७ मे रोजी त्याला बांदा येथे विकास पहेलवान, मोहन रेबाडी व विकी हे तिघे भेटले. स्वत:ला राजस्थानी म्हणवून घेणाऱ्या त्या तिघांनी राम यांच्याशी जवळीक साधली. आमचा काही माल इंदोरला न्यायचा आहे असे सांगून त्याला आर्ले नुवे बगल मार्गवर ट्रक पार्क करण्यास सांगितले.

ज्यांच्याकडून माल उचलायचा आहे त्यांचा फोन लागत नसल्याचे संशयिताने सांगितले. पहिल्यांदाच गोव्यात आलेल्या रामला घेऊन ते जुने गोवा येथे फ्लॅटवर गेले. त्याला एक टपाल दाखविण्यात आले. आम्ही कुंडई येथे जात असल्याचे सांगून ते निघून गेले. नंतर चालक राम हा ट्रक पार्क केलेल्या जागेवर गेला असता, त्याला आपला ट्रक गायब झाल्याचे दिसले. काहीजणांनी ट्रक घेऊन गेल्याचे त्याला घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितले. त्यामुळे राम यांनी काल गुरुवारी मायणा कुडतरी पाेलिस ठाणे गाठले व आपली कैफियत मांडली.

पोलिसांनी ट्रक चोरीचा तपास सुरू करत सुरुवातीला सुनील दत्त याच्या मुसक्या आवळल्या. सध्या विकास पहेलवान, मोहन रेबाडी व विकी फरार आहेत. तिघांनी सुनिल याच्याकडून २५ लाख घेतले होते. ते परत केले नव्हते. चोरलेला ट्रक आणि स्वत:ची कार त्यांनी सुनीलला दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. भादंसंच्या ३७९ कलमाखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक रवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवा