शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
3
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
4
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
5
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
6
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
7
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
8
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
9
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
10
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
11
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
12
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
13
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
14
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
15
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
16
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
17
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
18
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
19
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
20
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!

पर्यटक नाही; ड्रग्स येऊ लागले गोव्यात; चार दिवसांत दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 19:43 IST

चार दिवसांत २ किलो ड्रग्ज जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ लाख रुपये

म्हापसा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लवकर बंद झालेला पर्यटन व्यवसाय अद्यापपर्यंत पूर्णपणे सुरु झाला नाही. पर्यटकांअभावी किनारे ओस पडले आहेत. असे असले तरी ड्रग्स व्यवसायिकांनी ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी किनारी भागावर आपले लक्ष केंद्रीत करण्यावर भर देण्यास आरंभ केला आहे. मागील चार दिवसात उत्तर गोव्यातून दोघांना अटक करून त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या ड्रग्सवरून हे स्पष्ट होऊ लागले आहे.चार दिवसाच्या अंतरात पोलिसांनी २ किलो वजनाचे ड्रग्स दोघांकडून ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किमत सुमारे २ लाख रुपये आहे.ड्रग्स आणि पर्यटन असे समिकरण झालेल्या गोव्यातील पर्यटन व्यवसायावर कोरोनामुळे परिणाम झाले आहेत. पर्यटनाशी निगडीत सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. किनाºयाच्या आकर्षणामुळे येणारे पर्यटक अद्यापपर्यंत दाखल होऊ शकले नाही. त्यामुळे किनारी भाग सूने सूने वाटत आहे. मंदावले व्यवसाय पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहेत. किनाऱ्यावर आकर्षण ठरणाऱ्या शॅक्सची उभारणी करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आलेल्या नाहीत. असे असून ड्रग्स व्यवसायिकांनी ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत.गेल्या आठवड्यात हणजुणा पोलिसांनी शिवोली येथे चरस बाळगल्या प्रकरणी शोयब अन्सारी या मूळ उत्तर प्रदेश येथील इसमाला रंगेहात ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचा ७५ ग्राम चरस ताब्यात घेण्यात आला. तो ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती उपलब्ध होताच त्याच्यासाठी सापळा रचण्यात आला होता. निरीक्षक सुरज गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.शनिवारी मध्यरात्रीच्या सुमाराला कळंगुट पोलिसांनी मूळ राजस्थानातील एका व्यक्तीकडून सव्वा लाख रुपये किमतीचा गांजा ताब्यात घेतला आहे. निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित ओमप्रकाश ताड याच्याकडून १ किलो २०० ग्राम वजनाचा गांजा ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. चार दिवसात २ किलो वजनाचा तसेच २ लाख रुपये किमतीचा ड्रग्स पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे.