शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

गोव्यात १५ वर्षांहून अधिक जुनी १.९२ लाख वाहने मोडीत निघणार; वाहन स्क्रॅपिंग धोरण अधिसूचित

By किशोर कुबल | Updated: May 19, 2023 18:35 IST

पुढील पाच वर्षांच्या कालावधीत राज्यात आणखी साडेतीन लाख वाहने पंधरा वर्षे वर्षे ओलांडतील.

पणजी : गोव्यातील पंधरा वर्षांहून अधिक जुनी तब्बल १.९२ लाख वाहने मोडीत निघणार आहेत. राज्य सरकारने नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग धोरण-२०२३ अधिसूचित केले आहे.

पंधरा वर्षांहून अधिक काळ झालेली जुनी, अयोग्य वाहने स्क्रॅप करण्याबाबत तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे दिली जारी करण्यात आली आहेत. तसेच जुनी वाहने नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा विभागाकडे  स्वेच्छेने हस्तांतरित करणार्‍यांना प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे. वाहनांचे प्रदूषण कमी करणे, टप्पे टप्प्याने वाहने मोडीत काढणे, प्रदूषण करणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी करणे आणि पर्यावरणपूरक, नवीन तंत्रज्ञानाच्या वाहनांच्या खरेदीला चालना देणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. हे धोरण सुरुवातीला पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. गोव्यात १५ वर्षांहून अधिक जुनी, त्यांचा आयुष्य संपलेले आहे अशी अंदाजे १.९२ लाख वाहने आहेत. ही वाहने वेगवेगळ्या प्रकारची आहेत.

पुढील पाच वर्षांच्या कालावधीत राज्यात आणखी साडेतीन लाख वाहने पंधरा वर्षे वर्षे ओलांडतील. जुन्या वाहनांची संख्या वाढत चालल्याने व पर्यावरणासाठी ती चिंतादायक बाब ठरल्याने सरकारने नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग धोरण तयार केले आहे. ही वाहने  मोडीत काढून प्रदूषण कमी करणे, रस्ता, प्रवासी आणि वाहनांची सुरक्षा सुधारणे, वाहन क्षेत्राला चालना देणे आणि रोजगार निर्मिती करणे, इंधन कार्यक्षमता सुधारणे आणि वाहन मालकांसाठी देखभाल खर्च कमी करणे.   ऑटोमोटिव्ह, पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगासाठी कमी किमतीच्या कच्च्या मालाची उपलब्धता वाढवणे, वैज्ञानिक पद्धतीने वाहनांच्या स्क्रॅपच्या पुनर्वापराला चालना देणे, पर्यावरणपूरक पद्धतीने अर्थव्यवस्थेला चालना देणे आधी उद्दिष्ट्ये हे धोरण ठाण्यामध्ये आहे

लोकांना त्यांची वाहने स्वेच्छेने वरील विभागाकडे  सुपूर्द करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी  “सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट”दिले जाईल. त्यानंतर ही सर्टिफिकेट सादर करून नवीन वाहनाची खरेदी केल्यास मोटार वाहन करात सवलत स्क्रॅपिंगवर भरलेल्या कराच्या २५ टक्केच्या समतुल्य असेल. सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन असेल तर नवीन नोंदणीसाठी मोटार वाहन करात १५  टक्के सवलत असेल. सार्वजनिक वाहतुकीत नसलेल्या वाहनांना १५ वर्षांपर्यंत आणि सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना ८ वर्षांपर्यंत सवलत लागू असेल.

टॅग्स :goaगोवाcarकार