शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एसटींच्या १६ पंचायती

By admin | Updated: August 9, 2014 01:24 IST

पणजी : गावडा, कुणबी, वेळीप आदी अनुसूचित जमातींचे लोक ४0 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या १६ ग्रामपंचायती गोव्यात आहेत. या समाजातील लोकांना योजनांचा

पणजी : गावडा, कुणबी, वेळीप आदी अनुसूचित जमातींचे लोक ४0 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या १६ ग्रामपंचायती गोव्यात आहेत. या समाजातील लोकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी टक्केवारीनुसार आदिवासी कल्याण खात्याने या पंचायती अधिसूचित केल्या आहेत. उत्तर गोव्यात तिसवाडीत करमळी, शिरदोण-पाळे तर फोंड्यात केरी पंचायतीत अनुसूचित जमातींच्या लोकांची संख्या ४0 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दक्षिण गोव्यात सासष्टीत राशोल, केपे तालुक्यात मोरपिर्ला, बार्से, आंबाली, बाळ्ळी-अडणे, कावरे, मळकर्णे, अवेडे-कोठंबी, सांगे तालुक्यात नेतुर्ली, काणकोण तालुक्यात खोतिगाव, गावडोंगरी, खोला व श्रीस्थळ या पंचायतींमध्ये अनुसूचित जमातींचे प्रमाण ४0 टक्क्यांहून अधिक आहे. ३0 ते ३९.९९ टक्के अनुसूचित जमातींचे लोक असलेल्या पंचायतींमध्ये उत्तर गोव्यात डिचोलीतील पिळगाव, सुर्ला, सत्तरीत भिरोंडा, फोंड्यात वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये, मडकई या पंचायतींचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात मुरगावमध्ये वेर्णा, कुठ्ठाळी, नुवे, लोटली, वेळ्ळी, पारोडा या पंचायतींचा तर केपेत नाकेरी (बेतुल) या पंचायतींचा समावेश आहे. सांगेत भाटी, कुर्टी, रिवण, धारबांदोड्यात किर्लपाल-दाभाळ व धारबांदोडा या पंचायतींचा समावेश आहे. २0 ते २९.९९ टक्के अनुसूचित जमातींचा समावेश असलेल्या पंचायतींमध्ये उत्तर गोव्यात सत्तरीतील पिसुर्ले, फोंड्यातील भोम-अडकोण, कुंडई, बेतकी-खांडोळा, शिरोडा, पंचवाडी या पंचायतींचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात सासष्टीत राय, आंबेली, सां जुझे आरियल, केपेत फातर्पा, सांगेत उगे व काले या पंचायतींचा समावेश आहे. २0 टक्क्यांपेक्षा जास्त अनुसूचित जमातींचे लोक असलेल्या पालिकांमध्ये केपे या एकमेव पालिकेचा समावेश आहे. आदिवासी कल्याण खात्याच्या संचालिका संध्या कामत यांनी ही अधिसूचना काढली आहे. आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी अलीकडेच विधानसभेत अनुसूचित जमातींचे भाग लवकरच अधिसूचित केले जातील, असे जाहीर केले होते. (प्रतिनिधी)