शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CRZ नियमभंगाचे 152 खटले विविध न्यायालयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 21:30 IST

राष्ट्रीय हरित लवादासह विविध न्यायालयांमध्ये गोव्यातील सीआरझेड नियमभंगाचे एकूण 152 खटले प्रलंबित आहेत.

<p>पणजी : राष्ट्रीय हरित लवादासह विविध न्यायालयांमध्ये गोव्यातील सीआरझेड नियमभंगाचे एकूण 152 खटले प्रलंबित आहेत. पुणे येथील हरित लवादासमोर गोव्यातील सर्वाधिक म्हणजे 113 खटले प्रलंबित असल्याची लेखी माहिती विधानसभेत सादर झाली आहे. पेडणे, बार्देश, सासष्टी, काणकोण अशा काही तालुक्यांमधील समुद्र व नद्यांच्या सीआरझेड क्षेत्रामध्ये नियमभंग केल्याचे खटले विविध एनजीओंनी, पर्यावरणप्रेमींनी व अन्य लोकांनी न्यायालयात दाखल केले आहेत. सीआरझेड अधिसूचनेचा भंग करून किनारपट्टीत झालेली हॉटेल्स, बंगले, रेस्टॉरंट्स व अन्य बांधकामांबाबतचे हे खटले आहेत.राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली येथील प्रधान पीठासमोर गोव्याचे तीन खटले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर 23 खटले प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सात खटले आहेत. या शिवाय जिल्हा न्यायालयांसमोर सहा खटले प्रलंबित आहेत. गोवा हे पर्यटन राज्य असून मांद्रे, कळंगुटसह अन्य काही मतदारसंघांतील किनारपट्टी भागांमध्ये नियमांची काहीही पर्वा न करता बांधकामे केली जातात, असे प्रथमदर्शनी दिसते.दरम्यान, राज्यात आता खारफुटीचे एकूण क्षेत्र वाढले आहे, असे वन खात्याचे म्हणणे आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने (एफएसआय) सर्वेक्षण केले असून, किती प्रमाणात गोव्याचे क्षेत्र खारफुटीखाली आले आहे, याविषयी अहवाल दिला आहे. काही जमिनींमध्ये वगैरे खारफुटीचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. 26 चौरस किलोमीटर जमीन आता खारफुटीखाली आली आहे. यापैकी चोडणमधील एका सलीम अली पक्षी अभयारण्यामध्ये 1.78 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची जागा खारफुटीची आहे. उत्तर गोव्यात 20 आणि दक्षिण गोव्यात 6 चौरस किलोमीटर जागा खारफुटीने व्यापलेली आहे. खारफुटी कापणे हा वन कायद्यांनुसार गुन्हा ठरतो. यापूर्वी खारफुटी कापल्याचे काही खटले न्यायप्रविष्ट झाले आहेत. काणकोण तालुक्यात गालजीबाग-तळपणच्या पट्ट्यातही किंचित खारफुटी आढळून आली आहे.