पणजी : प्रदेश कॉँग्रेसच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून माजी आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्स यांच्यासह १३ जणांची समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे नव्याने नियुक्त केलेले सदस्य याप्रमाणे - उपाध्यक्ष : फिलिप नेरी रॉड्रिग्स, महासचिव : आग्नेल फर्नांडिस, पांडुरंग मडकईकर, सुनील कवठणकर, यतिश नायक आणि विजय पै. सचिव : दुर्गादास कामत, मारियो पिंटो, वामन चोडणकर, अतुल वेर्लेकर, देवेंद्र देसाई आणि महादेव नाईक. नियुक्त करण्यात आलेल्या नवीन सदस्यांत बहुतेक सदस्य हे तरुण आहेत. नवीन युवकांना पक्षात स्थान देण्याच्या पक्षाच्या निर्णयाचा हा भाग असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. पिंटो, चोडणकर हे अनेक वर्षे काँग्रेसचे काम करत आहेत. कवठणकर यांनी एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी यशस्वीपणे काम केले आहे. कामत यांनी प्रवक्ते म्हणून नेहमीच प्रभावीपणे काम केले. विजय पै हे २००५ सालापासून काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत. १९९४ सालापासून काँग्रेसच्या विविध पदांवर काम करत ते पुढे आले आहेत. फिलिप नेरी, आमदार मडकईकर, आग्नेल फर्नांडिस हे फालेरो प्रदेशाध्यक्ष बनल्यापासून पक्षासाठी सक्रिय झाले आहेत. (प्रतिनिधी)
फिलिप नेरींसह १३ जणांची नियुक्ती
By admin | Updated: February 18, 2015 01:58 IST