शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

‘१0८’चा रुग्णांच्या जीवाशी खेळ!

By admin | Updated: January 12, 2015 01:53 IST

राज्यातील चित्र : तीन लाख किलोमीटरवर धावलेल्या रुग्णवाहिकांचा धोकादायक वापर

किशोर कुबल- पणजी : अपघात तसेच आरोग्याबाबत आणीबाणीवेळी रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी सुरू केलेल्या ‘१0८ रुग्णवाहिका’च आता रुग्णांच्या जीवावर उठल्या आहेत. १३ प्रशिक्षित पॅरामेडिक्सना (पॅरामेडिकलचा अद्ययावत अभ्यासक्रम पूर्ण केलेले) सेवेतून काढून अननुभवींना घेतले आहे. आणखी कहर म्हणजे तीन लाख किलोमीटरहून जास्त धावलेल्या आणि धोकादायक झालेल्या रुग्णवाहिकांचाही सर्रास वापर चालू आहे. अलीकडेच शिरदोण येथे झालेल्या अपघातानंतर हे सत्य उघडकीस आले. भारतीय मजूर संघाकडे संलग्न असलेल्या ‘१0८’ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हृदयनाथ शिरोडकर यांनी याबाबत आरोग्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यांनी या सर्व गोष्टी निदर्शनास आणताना जीव्हीके ईएमआरआय कंपनीचे कंत्राट रद्द करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ३३ रुग्णवाहिका आहेत, पैकी निम्म्याच कार्यरत आहेत. काही रुग्णवाहिका चालविण्याच्याही स्थितीत नाहीत. कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षणाचा खर्च वसूल करून सोडले वाऱ्यावर सरकारने प्रत्येकी साडेतीन लाख रुपये खर्चून १३ कर्मचाऱ्यांना पॅरामेडिक्सच्या प्रशिक्षणासाठी हैदराबादला पाठवले होते. या प्रशिक्षितांना पाच वर्षे सेवेत ठेवून काढून टाकले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३0 हजार रुपये पगार देऊ, असे सांगून सेवेत घेतले होते. प्रत्यक्षात त्यांच्या हातावर महिना १३ हजार रुपयेच पगार दिला. प्रशिक्षणासाठी जो खर्च झाला तो प्रत्येकाच्या पगारातून कापून घेतला. या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने काढल्याने आता घरी बसावे लागले आहे. या पॅरामेडिक्सना सेवेतून काढून टाकल्यानंतर साखळी, कांदोळी, वास्को, चिखली, काणकोण येथील पाचही इमर्जन्सी केंद्रे गुपचूप बंद केली. इतकेच नव्हे तर त्याची कोठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम होतील, असे कर्मचाऱ्यांना बजावले. तेथील अद्ययावत वैद्यकीय यंत्रणा आता विनावापर पडून आहे. शेवटच्या महिन्याचा पगारही नाही कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी केल्यानंतर शेवटच्या महिन्याचा पगारही व्यवस्थापनाने दिलेला नाही. चार महिने कर्मचारी बेरोजगार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पाच महिन्यांपूर्वी जुने गोवे, वेर्णा, वास्को व अन्य ठिकाणच्या सहा रुग्णवाहिका तीन लाखांपेक्षा अधिक किलामीटर धावल्याने मोडीत काढल्या; परंतु काही दिवसांतच त्या प्रसूत झालेल्या गरजू महिलांना घरी पोहोचविण्यासाठी म्हणून सुरू केल्या. या रुग्णवाहिका बऱ्याचदा वाटेत नादुरुस्त होतात, असे एका चालकाने सांगितले. ३३ पैकी दोन रुग्णवाहिका आजारी लहान मुलांसाठी होत्या त्यातील एक दीड वर्ष बंद आहे. दुसरी चालू आहे; पण कर्मचारी नाहीत. होय, रुग्णवाहिका जुन्याच : डिसोझा आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा म्हणाले रनिंग मर्यादा ओलांडलेल्या रुग्णवाहिका सेवेत आहेत. पेडणे व काणकोणमध्ये रुग्णवाहिकांच्या फेऱ्या अधिक होतात, याची कारणे शोधून काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेजारी राज्यांमधून येणारे रुग्ण हद्दीपर्यंत येतात आणि तेथून ‘१0८’ सेवेचा लाभ घेतात म्हणून या फेऱ्या वाढतात, असा अंदाज आहे. गेल्या महिन्यात एकाच दिवशी काणकोणात १३७, तर पेडणेत १0३ फेऱ्या झाल्या. सरासरी १0 ते १५ कॉल्स होतात. या दोन्ही तालुक्यांतील रुग्णवाहिकांचे रनिंग जास्त झालेले आहे. त्या बदलल्या जातील. साधारण एक तृतियांश रुग्णवाहिका बंद आहेत. फिरते दवाखाने धूळखात मेम्मोग्राफीची सोय असलेले फिरते दवाखाने धूळखात पडून आहेत. अडीच वर्षांत या वाहनांचा वापर झाला नाही त्यामुळे ती गंजलेली आहेत. या प्रकरणी आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी आरोग्य सचिवांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. सांगितले एक... केले दुसरेच सेवेतून कमी केलेल्या एका प्रशिक्षित महिला पॅरामेडिक्सने सांगितले की, कायम नोकरी मिळेल, या आशेने आम्ही हैदराबादला जाऊन दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पाच वर्षांनंतर कायम सेवेत घेणार, असे आम्हाला सांगितले होते; परंतु आता घरी पाठवले आहे.