शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित बियाण्यांसाठी जि.प.चा हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:30 IST

दरवर्षी जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. पण यावर्षी हे अनुदान देताना जिल्हा परिषदेने हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. पंचायत समित्यांपुढेही या अनुदानाचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचा आणि कोणाला सोडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका । वाढीव अनुदानाची पंचायत समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षी जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. पण यावर्षी हे अनुदान देताना जिल्हा परिषदेने हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. पंचायत समित्यांपुढेही या अनुदानाचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचा आणि कोणाला सोडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर अनुदानात वाढ करण्याची मागणी करणारा ठराव गडचिरोली पंचायत समितीने आपल्या मासिक सभेत शुक्रवारी केला.यावर्षी धानासाठी प्रतिलाभार्थी ७००, तुरीसाठी १०० तर सोयाबीनसाठी १००० रुपये अनुदान डीबीटी तत्वावर दिले जात आहे. परंतू ५१ ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या गडचिरोली पंचायत समितीसाठी मोजकेच अनुदान देण्यात आले. यात धानाच्या बियाण्यासाठी १ लाख २२ हजार, सोयाबीनसाठी ४ हजार तर तुरीसाठी ८९ हजार असे अनुदान देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले. परंतू लाभार्थी शेतकºयांची संख्या पाहता हे अनुदान मोजक्याच शेतकऱ्यांना पुरणार आहे. आतापर्यंत धानाच्या अनुदानाचा लाभ १८१ शेतकऱ्यांनी तर तुरीच्या १०० रुपये अनुदानाचा लाभ जेमतेम १० शेतकऱ्यांनी घेतला आहे.गडचिरोलीसह इतरही पंचायत समित्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात असेच अनुदान देण्यात आले आहे. वास्तविक ७० टक्के शेतकरी पंचायत समितीमार्फत मिळणाऱ्या अनुदानित बियाण्यांवर अवलंबून असतात. परंतू अनुदान कमी आणि शेतकरी जास्त अशी स्थिती झाल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे. त्यांचा विचार करून जिल्हा परिषदेने वाढीव अनुदान द्यावे, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे यांनी केली आहे.आधी शेतकºयांकडे थेट अनुदान दिले जात होते. परंतू आता डीबीटी प्रणालीमुळे काही शेतकरी फक्त बिले जोडून लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. यातून योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणे कठीण होत असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्याच्या दक्षिण भागात कापसाचा जास्त असला तरी त्या भागातील शेतकºयांना या अनुदानाचा लाभ मिळत नाही. वास्तविक कापसाचे बियाणे महाग असल्यामुळे त्यांना जास्त अनुदानाची गरज आहे. परंतू नियोजनाच्या अभावामुळे अपेक्षित अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती