शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चे आरक्षण जाहीर

By admin | Updated: October 6, 2016 02:05 IST

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्राचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले.

महिलांसाठी २६ जागा राखीव : सोडत पद्धतीने ५१ क्षेत्र घोषितगडचिरोली : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्राचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात ५१ जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी ५ मतदारसंघ, त्यापैकी महिलांसाठी ३ मतदारसंघ, अनुसूचित जमातीसाठी २२ मतदारसंघ, त्यापैकी महिलांसाठी ११ मतदारसंघ, नागरिकांच्या मागास प्रवगार्साठी १४ मतदारसंघ व त्यातील ७ मतदारसंघ महिलांसाठी, खुल्या प्रवर्गासाठी १० मतदारसंघ, त्यापैकी महिलांसाठी ५ मतदारसंघ राखीव करण्यात आले. नियमाप्रमाणे महिलांना ५० टक्के मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी सोडत पध्दतीने जिल्हा परिषदेच्या ५१ जागांचे आरक्षण जाहीर केले. यामध्ये २५ जागा पुरूषांकरिता तर २६ जागा महिलांकरिता निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय जागांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम असल्याने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्य, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया दुपारी १ वाजतापासून जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात सुरू केली. लहान मुलांच्या हाताने सोडत काढण्यात आली. या सोडतीच्या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार एम. टी. दहीकर, सुनिल चडगुलवार, अव्वल कारकुन उत्तरा राऊत, एस. एस. चापले व कनिष्ठ लिपीक नितेश चिताडे यांनी सहकार्य केले. जि.प. क्षेत्रांची नावे स्लाईड प्रोजेक्टरवर दाखविण्यात येत होती. लहान मुलांच्या हाताने सोडत निघाल्यानंतर जिल्हाधिकारी नायक सदर जागांचे आरक्षण ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करीत होते. या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प.चे वित्त नियोजन व बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, जि.प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, केसरी उसेंडी, पद्माकर मानकर, मनोहर पोरेटी छाया कुंभारे, सुनंदा आतला, सुकमा जांगधुर्वे, अरविंद कात्रटवार, महेंद्र ब्राम्हणवाडे आदीसह अनेक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)दोन्ही नगर पालिकांवर येणार महिलाराज गडचिरोलीत नामाप्र महिला : देसाईगंजात खुल्या प्रवर्गातील महिलेला संधीसंपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागलेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबईतील मंत्रालयात काढण्यात आली. त्यात गडचिरोली नगर परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी, तर देसाईगंज नगर परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव करण्यात आले. पूर्वी नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असल्याने गडचिरोलीचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (सर्वसाधारण), तर देसाईगंजचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) राखीव होते. परंतु यंदा होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आरक्षण बदलण्याचे वारे वाहू लागले होते. आरक्षण सोडत काढल्यानंतर गडचिरोलीचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने आता पक्षांना दमदार महिला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. देसाईगंज येथील नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. एकूणच, दोन्ही नगर परिषदांवर महिला राज येणार आहे.