शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प., पं.स. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडा

By admin | Updated: January 23, 2017 00:52 IST

फेब्रुवारी महिन्यात होणारी गडचिरोली जिल्हा परिषद व बाराही पंचायत समित्या गणाच्या निवडणुकीचे काम अचूक व सुरळीत पार पाडण्यात यावे, ...

निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचे निर्देश : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला गडचिरोलीत आढावागडचिरोली : फेब्रुवारी महिन्यात होणारी गडचिरोली जिल्हा परिषद व बाराही पंचायत समित्या गणाच्या निवडणुकीचे काम अचूक व सुरळीत पार पाडण्यात यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रविवारी निवडणूक कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी, निवडणूक विभागाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, उपविभागीय अधिकारी आंधळे, तळपादे, टोनगावकर, राममूर्ती, इटनकर, चांदूरकर, विजय मुळीक, निलावार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व नोडल अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्यात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या आठ तालुक्यात १६ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्यात २१ फेब्रुवारी रोजी एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या चार तालुक्यात मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा व निवडणूक कामाचा संपूर्ण आढावा आयुक्त सहारिया यांनी यावेळी घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)मेळाव्यातून जनजागृती पहिल्या टप्प्यात ४ लाख ३६ हजार ५५२ तर दुसऱ्या टप्प्यात १ लाख ६० हजार २४७ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मतदार जनजागृतीसाठी जिल्हा परिषद गटक्षेत्रनिहाय जनजागृती मेळावे घेण्यात येत आहे. गोंडी, तेलगू, छत्तीसगडी, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्रकातून जनजागृती सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी दिली.अतिसंवेदनशील क्षेत्रातील काही मतदान केंद्र सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वेळेवर हलविण्याचे नियोजन असल्याचे एसपी देशमुख यांनी सांगितले.