शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. कृषी व बांधकाम सभापतीवर अविश्वास दाखल

By admin | Updated: September 27, 2015 01:00 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेचे बांधकाम, नियोजन सभापती अतुल गण्यारपवार व कृषी व पशुसंवर्धन सभापती...

१९ सदस्यांनी केल्या स्वाक्षऱ्या : ३८ सदस्य तीर्थाटनावर रवाना झाल्याची चर्चागडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे बांधकाम, नियोजन सभापती अतुल गण्यारपवार व कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार या दोघांविरोधात २४ सप्टेंबर रोजी १९ सदस्यांच्या सहीनिशी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत पुन्हा अविश्वासाच्या नाट्याचा दुसरा भाग रंगत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाची एकहाती सत्ता नाही. ५० सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, भाजपचे ९, शिवसेनेचे २, युवाशक्ती आघाडीचे ७, आविसचे तीन, नाग विदर्भ आंदोलन समितीचे चार, तीन अपक्ष असे संख्याबळ आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत कुत्तरमारे अध्यक्ष तर काँग्रेसचे जीवन नाट उपाध्यक्ष पदावर विराजमान आहे. अपक्ष विश्वास भोवते समाज कल्याण सभापती पदावर असून नाविसच्या सुवर्णा खरवडे महिला बालकल्याण सभापती म्हणून काम पाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. परंतु पक्षापासून दूर असलेले अतुल गण्यारपवार बांधकाम सभापती व आविसचे जि.प. सदस्य म्हणून निवडून आलेले अजय कंकडालवार कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून काम पाहत आहे. मागील आठवड्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष व समाज कल्याण सभापती यांनी स्वत:वर अविश्वास प्रस्ताव दाखल करून घेतला होता. त्यानंतर आता अतुल गण्यारपवार व अजय कंकडालवार यांच्यावर २४ सप्टेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या नेतृत्वात १९ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षाचे सदस्य सहभागी असल्याचा दावा राजकीय वर्तुळातून केला जात आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल होताच ३८ सदस्य तिर्थाटनासाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेस पक्षही अतुल गण्यारपवार यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावरून दुभंगलेल्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अविश्वास प्रस्तावावर नेमकी काय राजकीय घडामोड होते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. भाजपजवळ नाविसचे संख्याबळ पकडता १५ च्या जवळपास सदस्य जातात. असा दावा भाजपतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय जाणकारांचे याकडे लक्ष आहे. (जिल्हा प्रतिनिधी)