शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विषारी दारू पिल्याने युवकाचा मृत्यू

By admin | Updated: August 30, 2014 23:43 IST

तान्हा पोळाच्या दिवशी विषारी दारू प्राशन करणाऱ्या युवकाचा आरमोरी येथे २८ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.

वनखी येथील घटना : रूग्णालयात झाला मृत्यूठाणेगाव : तान्हा पोळाच्या दिवशी विषारी दारू प्राशन करणाऱ्या युवकाचा आरमोरी येथे २८ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.आरमोरी तालुक्यातील वनखी येथील विकास श्रीहरी बावणे (२६) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. विकास बावणे यांनी तान्हा पोळ्याच्या दिवशी गावातील इतर युवकांसह दारू प्राशन केली होती. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने आरमोरी येथील एका खासगी रूग्णालयात त्याला उपचारार्थ भरती करण्यात आले होते. परंतु आरमोरी येथील डॉक्टरांनी त्याला ब्रह्मपुरी येथे हलविण्यास सांगितले. त्यानंतर ब्रह्मपुरी येथील डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीची तपासणी केली असता, प्रकृती गंभीर आढळल्याने नागपुरला हलविण्यास सांगितले. दरम्यान नागपूर येथे उपचार करीत असताना विकास बावणे याचा २८ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. विकास बावणे याचा मृत्यू विषारी दारूमुळेच झाला, असे डॉक्टरांनी सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे वनखी परिसरातील दारूमध्ये युरीया, कडुलिंब व इतर पदार्थांची भेसळ होत असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. विकास यांच्या पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. वनखी, वैरागड परिसरात होत असलेल्या अवैध दारूच्या विक्रीच्या बंदीसंदर्भात तालुका भाजपच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आरमोरी पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे वनखीतील युवकास आपला जीव गमवावा लागला, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. कारवाईची मागणीही भाजपने केली आहे. (वार्ताहर)